Nagpur Crime: फडणवीसांच्या नागपुरात फोफावतेय गुन्हेगारी; गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ

Nagpur Crime
Nagpur Crimeesakal

नागपूर: गेल्या २० दिवसांत शहरातील परिमंडळ व पोलिस ठाण्यामधील पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत दहा पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणात काडतूस जप्त करण्यात आले. त्यामुळे शहरात ‘पिस्तुल राज’ सुरू होत आहे की काय? असे चित्र निर्माण होत आहे.

शहरात क्राईम कंट्रोलसाठी पोलिस आयुक्तांकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्यातून गुन्हेगारांवर एनडीपीए आणि मोकाअंतर्गत कारवाई करीत अनेकांना कारागृह आणि शहराच्या हद्दीबाहेर ठेवण्याचा सपाटा त्यांनी लावला.

त्यातून दोन वर्षांत मोठमोठ्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यात यश आले. विशेष म्हणजे, गुन्हेगार सुटल्यावरही त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी बीट मार्शलसह ठाण्यांना ‘टारगेट’देत कारवायांवर लक्ष ठेवण्यास सांगितले.

Nagpur Crime
Karnataka Congress: लोकसभा निवडणुकीपूर्वी ॲक्सीटेंड होऊन काँग्रेस सरकार कोसळणार; भाजप नेत्याचा दावा

पण गेल्या महिन्याभरात शहरात पिस्तुल दाखवून लुटणे, धमकावणे आणि पिस्तुल बाळगण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे, काहीच दिवसांपूर्वी शहरातील २७ पिस्तुल धारकांची परवाना रद्द करण्याचीही कारवाई करीत, वचक निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, गेल्या पंधरा ते वीस दिवसांत वेगवेगळ्या घटनांत १० पिस्तुल पोलिसांनी जप्त केल्या.

यामध्ये एका युवकाकडे कळमन्यात पाच देशी आणि विदेशी बनावटीच्या पिस्तुल जप्त करण्यात आल्या. याशिवाय ३० मे रोजी दोन तर इतर तीन कारवायांमध्ये चार पिस्तुल जप्त केल्या. शहरात दीड ते दोन हजारावर पिस्तुल धारक आहेत. पोलिस आयुक्तांनी त्यापैकी २७ परवानाधारकांचे परवाने रद्द केले आहेत.

शौक, धाक आणि लुटमारीसाठी वापर

युवकांमध्ये कट्ट्यांची क्रेझ आहे. त्यातून शौकासाठीही त्याचा वापर होताना दिसतो. उच्च वर्गातील युवकांद्वारे त्याचा इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर ‘रिल’साठी तर गुन्हेगारी प्रवृत्तीतील युवकांमध्ये खंडणी, धमकी आणि लुटमारीसाठी त्याचा वापर होताना दिसून येतो.

Nagpur Crime
Nagpur: दुर्दैवी! नागपुरात महिन्याला ४६ गर्भवती मृत बाळासह येतात प्रसूतीसाठी; वर्षभरातील धक्कादायक आकडेवारी समोर

सीमेवरील ठाणे संवेंदनशील

शहराच्या सीमेवर असलेल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अधिकाअधिक पिस्तुलचा वापर होत असल्याचे समजते. विशेष म्हणजे, कामठी परिसरातीस खदान, यशोधरानगर, कोराडी, एमआयडीसी, हिंगणा, गिट्टीखदान, कळमना या परिसरात असलेल्या झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात देशीकट्टे असल्याचे आढळून आले आहे.

सहजरित्या येते शहरात

नागपुरात देशीकट्टा वा पिस्तुल सहजरित्या शहरात येते. उत्तरप्रदेश आणि बिहारमधून देशी कट्टा खरेदी करून तो रेल्वेमार्फत शहरात येतो. शहराच्या हद्दीत रेल्वे येताच, आऊटर भागात रेल्वे स्लो झाल्यावर युवक खुष्कीच्या मार्गाने ते शहरात आणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com