नांदेड : महावितरण विभागाने गेल्या पाच वर्षात नांदेड जिल्ह्यात एक लाख ३१ हजार ९८७ नवीन जोडण्या दिल्या असून त्यामुळे अनेकांची घरे प्रकाशाने उजळली आहेत. महावितरण वीज ग्राहकांना वीज सेवा देण्याबरोबरच मागेल त्यांना वीज जोडणी देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
याचाच भाग म्हणून महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालय अंतर्गत मराठवाड्यात (ता. एक) डिसेंबर २०१८ ते (ता.एक) डिसेंबर २०२३ या पाच वर्ष कालावधीत सर्व वर्गवारीतील सरासरी सात लाख ९७ हजार ८२१ ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेषतः पाच लाख ९३ हजार १७८ घरगुती वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. नवीन वीज जोडणीसाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरण दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी आधुनिक सुविधांसह तयार आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नव्या वीज जोडणीसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहकांनी नव्या वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. त्यानुसार पायाभुत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी शहरी भागातील ज्या ग्राहकांनी शुल्क भरले त्यांना चोवीस तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज जोडणी देण्यावर भर देण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.