नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक हजार ६२ व्यक्ती कोरोनाबाधित; २३ जणांचा मृत्यू

अभय कुळकजाईकर
Tuesday, 6 April 2021

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

नांदेड - जिल्ह्यात आज मंगळवारी (ता. सहा) प्राप्त झालेल्या चार हजार २८५ अहवालापैकी एक हजार ६२ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४३२ तर अँटिजेन तपासणीद्वारे ६३० अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ४९ हजार ६३७ एवढी झाली असून यातील ३७ हजार ७४९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १० हजार ६९८ रुग्ण उपचार घेत असून १९९ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
ता. दोन ते ता. चार एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ९४४ एवढी झाली आहे. ता. दोन एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे देगलूर नाका नांदेड येथील ४५ वर्षाची महिला, दत्तनगर नांदेड येथील ५० वर्षाची महिला, ता. तीन एप्रिल रोजी लोहार गल्ली नांदेड येथील ६५ वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील चोंडी येथील ७५ वर्षाचा पुरुष, जयभवानी नगर नांदेड येथील ५८ वर्षाचा पुरुष, अर्धापूर येथील ६० वर्षाचा पुरुष, लेबर कॉलनी नांदेड येथील ६८ वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नायगाव तालुक्यातील नरसी येथील ५५ वर्षीय पुरुष, गाडीपुरा नांदेड येथील ७८ वर्षाचा पुरुष, चैतन्य नगर नांदेड येथील ८० वर्षाची महिला, मुदखेड येथील ४४ वर्षाचा पुरुष, भावसार चौक नांदेड येथील ५८ वर्षाचा पुरुष, हदगाव येथील ६५ वर्षाची महिला, गणेश नगर नांदेड ६० वर्षाचा पुरुष, हज्जापूर ता. बिलोली येथील ६५ वर्षाचा पुरुष, पिंपळकौठा ता. मुदखेड येथील वर्षाची ६५ महिला, अर्धापूर येथील ५५ वर्षाचा पुरुष, वायफल्पना हदगाव येथील ६५ वर्षाची महिला पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय कामरी ता.हिमायतनगर येथील ४५ वर्षाचा पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय मुखेड येथील ४४ वर्षाचा पुरुष, नवळी ता. मुखेड येथील ५२ वर्षाचा पुरुष, निर्मल कोविड रुग्णालय हरबल ता. लोहा येथील ८० वर्षाचा पुरुष, गोकुळ नगर नांदेड येथील ८५ वर्षाचा, असे एकूण २३ रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

हेही वाचा - नांदेडकरांसाठी वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावाविषयी महत्त्वपूर्ण सुचना व कळकळीची विनंती; एकदा लक्षपुर्वक वाचा

मंगळवारी एक हजार ६९८ बाधितांना सुटी
मंगळवारी एक हजार ६९८ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी १२, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण ६९५, कंधार तालुक्याअंतर्गत ४, किनवट कोविड रुग्णालय ९, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत ११, भोकर तालुक्याअंतर्गत ३५, बिलोली तालुक्याअंतर्गत १७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २४, उमरी तालुक्याअंतर्गत ४२, नायगाव तालुक्याअंतर्गत  १५, मुखेड कोविड रुग्णालय ७, देगलूर तालुक्याअंतर्गत  २१, बारड कोविड केअर सेंटर ८, खाजगी रुग्णालय १२५, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ६, हदगाव कोविड रुग्णालय १६, मांडवी कोविड केअर सेंटर ८, धर्माबाद तालुक्याअंतर्गत १, लोहा तालुक्याअंतर्गत १९, अर्धापूर तालुक्याअंतर्गत १७ असे एकूण १ हजार ६९८ बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.०५ टक्के 
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.०५ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २१४, देगलूर १६, लोहा ४४, नायगाव १५, यवतमाळ २, नांदेड ग्रामीण ११, हदगाव २९, माहूर १, उमरी १, अर्धापूर   ४, कंधार ३१, मुदखेड ३, परभणी १, भोकर १६, किनवट १५, मुखेड २६, हिंगोली ३ असे एकूण ४३२ बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २४५, बिलोली ३०, हिमायतनगर ३, माहूर १, उमरी ६, परभणी २, नांदेड ग्रामीण १९, देगलूर ३६, कंधार १२, मुदखेड ५, बीड २, लातूर १, अर्धापूर २९, धर्माबाद ९, किनवट ६२, मुखेड २७, उस्मानाबाद १, आदिलाबाद २, भोकर २५, हदगाव ५, लोहा ७५, नायगाव ३१, हिंगोली २ असे एकूण ६३० व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड महापालिकेच्या सभेत अर्थसंकल्प सादर; महापौरांना सर्वाधिकार 

दहा हजार ६९८ बाधितांवर औषधोपचार सुरु 
जिल्ह्यात १० हजार ६९८ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २४०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ११२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) १९९, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १४३, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १३३, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ४३६, देगलूर कोविड रुग्णालय ५१, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर १०७, बिलोली कोविड केअर सेंटर २२५, हिमायतनगर कोविड केअर सेंटर ७, नायगाव कोविड केअर सेंटर १५७, उमरी कोविड केअर सेंटर २४, माहूर कोविड केअर सेंटर १२, भोकर कोविड केअर सेंटर २४, हदगाव कोविड रुग्णालय ३३, हदगाव कोविड केअर सेंटर ४०, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १२८, कंधार कोविड केअर सेंटर २७, धर्माबाद कोविड केअर सेंटर ७२, मुदखेड कोविड केअर सेंटर ११, अर्धापूर कोविड केअर सेंटर ४१, बारड कोविड केअर सेंटर २०, मांडवी कोविड केअर सेंटर १०, महसूल कोविड केअर सेंटर १२१, एनआरआय कोविड केअर सेंटर २२०, पंजाब भवन कोविड केअर सेंटर १५७, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ४ हजार ९१५, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण १ हजार ६०५, खाजगी रुग्णालय १ हजार ४२८ असे एकूण १० हजार ६९८ रुग्ण उपचार घेत आहेत. आज रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ७, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे ६ खाटा उपलब्ध आहेत.

नांदेड कोरोना मीटर

  • एकुण स्वॅब- ३ लाख ४३ हजार ९५२
  • एकुण निगेटिव्ह - २ लाख ८७ हजार ३४८
  • एकुण पॉझिटिव्ह - ४९ हजार ६३७
  • एकूण बरे - ३७ हजार ७४९
  • एकुण मृत्यू -९४४
  • आज प्रलंबित स्वॅब -३५८
  • उपचार सुरू -१० हजार ६९८
  • अतिगंभीर प्रकृती - १९९

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1,062 persons coroned in Nanded district; 23 killed nanded news