Cheating In Exams : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत आढळले बारा कॉपीबहाद्दर
Education News : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत १२ विद्यार्थ्यांना कॉपी करतांना पकडले गेले. कंधार आणि लोहा येथील महाविद्यालयांना अचानक भेट देत संबंधित विद्यार्थ्यांविरुद्ध विद्यापीठाने कारवाई केली.
नवीन नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि स्कॉडमधील अधिकाऱ्यांनी कंधार आणि लोहा येथील काही महाविद्यालयांना परीक्षेदरम्यान अचानक भेटी दिल्या.