बारावी पास शेतकऱ्याची ‘हायटेक’ शेती

भूमिहीन ते वीस एकर शेतीचा मालक : दुग्धव्यवसायावर रतन गिरींचा प्रवास
nanded
nandedsakal

तामसा : १८ वर्षांपूर्वी भूमिहीन असलेले दिग्रस (ता. हदगाव) येथील तरुण शेतकरी रतन गिरी हे आता वीस एकर शेतीचे मालक बनले आहेत. गिरी यांचा अशक्य ते शक्य प्रवास प्रत्यक्षामध्ये साकारण्याचे माध्यम हे दूध व्यवसाय आहे.

बारावीपर्यंत शिकलेले रतन गिरी यांनी बावीस वर्षांपूर्वी म्हैस खरेदी करून तामसा येथे हॉटेलमध्ये दुध विक्रीचा छोटेखानी व्यवसाय चालू केला. त्यांच्या वडिलांनी अडीच एकर शेती वर्ष २००० मध्ये विकली. वडील रोजमुजरी करून कुटुंबाचे पालनपोषण करायचे. दुध विक्रीतून मिळकत वाढल्याने त्यांच्याकडे म्हशींची संख्या वाढली. २००५ मध्ये शेती विकत घेऊन ते पुन्हा शेतकरी बनले. गिरी कुटुंबीय शेतात मेहनत करू लागले.

बारावीपर्यंत शिकलेले रतन गिरी यांनी बावीस वर्षांपूर्वी म्हैस खरेदी करून तामसा येथे हॉटेलमध्ये दुध विक्रीचा छोटेखानी व्यवसाय चालू केला. त्यांच्या वडिलांनी अडीच एकर शेती वर्ष २००० मध्ये विकली. वडील रोजमुजरी करून कुटुंबाचे पालनपोषण करायचे. दुध विक्रीतून मिळकत वाढल्याने त्यांच्याकडे म्हशींची संख्या वाढली. २००५ मध्ये शेती विकत घेऊन ते पुन्हा शेतकरी बनले. गिरी कुटुंबीय शेतात मेहनत करू लागले. म्हशींची संख्या वाढत गेल्याने त्यातील कमाईतून शेती वाढविण्यावर त्यांनी भर दिला.

nanded
Nanded News : शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा परिषद शाळा दत्तक

आज त्यांच्याकडे २० एकर शेती असून त्यात आठ जाफराबादी म्हैस व ११ एफएच जातीच्या दुभत्या गाई आहेत. त्यांनी गाई चार महिन्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातून बारा लक्ष रुपये खर्चून खरेदी केल्या. सध्या गाई व म्हशीच्या अंदाजे अडीचशे लिटर दूधाची ते रोज विक्री करतात. चारापाण्यावर रोज अंदाजे तीन हजार रुपयांचा खर्च येतो. गाई म्हशींची दोन-तीन दिवसानी नियमित शारीरिक तपासणी करून उपचार करण्याची काळजी होते.

गाईंसाठी अर्ध्या एकरात मुक्तसंचार गोठा उभारण्यात आला. ज्यामुळे गाईंना गोठ्यात फिरून एका जागी उभे व बसून राहण्यामुळे संभाव्य त्रास व आजार टाळला जातो. गाई म्हशींच्या चाऱ्यासाठी मक्का, गजरा यांची लागवड शेतात करून वर्षभर चाराटंचाई होणार नाही, याची काळजी होते. शेतातील सौर ऊर्जेमुळे विज खंडित झाल्याने पाणी प्रश्न उद्भवत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com