रविवारी नांदेड जिल्ह्यात १४१ पॉझिटीव्हची भर; २१७ जणांची कोरोनावर मात 

File Photo
File Photo

नांदेड : दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढतच असून शनिवारी (ता. आठ) प्रलंबित असलेल्या स्वॅबचे रविवारी (ता.नऊ) सायंकाळी एक हजार १८८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार सहा निगेटिव्ह तर १४१ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात चौघांचा मृत्यू झाला. दुसरीकडे रविवारी सर्वाधिक २१७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढत जाणारी संख्या कमी करण्याच्या उद्देशाने नांदेड महापालिकेच्या वतीने उशिरा का होईना औरंगाबादेत यशस्वी झालेला पॅटर्न नांदेडात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील व्यावसायिक व दुकानदार व कर्मचाऱ्यांची कोरोना अँटीजन तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे. दरम्यान जिल्ह्यात (ता.तीन) ऑगस्ट ते (ता.नऊ) ऑगस्ट पर्यंत अवघ्या आठवडाभरात तब्बल एक हजार १४१ बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. तर बळींचे प्रमाणही झपाट्याने वाढले असून आठवड्याभरात ३० रुग्णांचा बळी गेला आहे. 

२४ तासात १४१ रुग्णांची वाढ

दररोज सरासरी १५० नागरिकांचा अहवाल बाधित येत आहेत. मागील २४ तासात तब्बल १४१ रुग्ण आढळून आले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजघडीला एकूण रुग्णसंख्या तीन हजार २९७ वर पोहचली आहे. रविवारी सर्वाधिक २१७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चौघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२० वर पोहचली आहे. 

जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या तीन हजार २९७

रविवारी एक हजार १८८ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले त्यापैकी एक हजार सहा नमूने निगेटीव्ह, १४१ पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये आरटीपीसीआरद्वारे केलेल्या तपासणीत ६२, अँटिजन टेस्ट किट्सद्वारे केलेल्या तपासणीत ७९ असे १४१ बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या तीन हजार २९७ झाली आहे. आजवर रुग्णालयातून एक हजार ६३२ घरी परतले आहेत. एक हजार ५२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारच्या २८६ स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे. 

तारीख आठवड्यातील बाधित मृत्यू संख्या ​
तीन ऑगस्ट  २०३  चार 
चार ऑगस्ट   १३७ तीन 
पाच ऑगस्ट १९६  सहा 
सहा ऑगस्ट १६८ सहा 
सात ऑगस्ट १८२  पाच 
आठ ऑगस्ट  ११४ दोन 
नऊ ऑगस्ट  १४१ चार 
आठवडाभरात एकूण बाधित- एक हजार १४१  मृत्यू ३० 
रविवारची जिल्ह्याची स्थिती   
एकूण बाधित १४१ 
एकूण मृत्यू चार 
एकूण मुक्त २१७ 
जिल्ह्यातील स्थिती   
बाधित तीन हजार २९७ 
कोरोनामुक्त एक हजार ६३२ 
मृत्यू १२० 
उपचारार्थ एक हजार ५२८ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com