esakal | नांदेडला २३ कोरोनाबाधितांचा मृत्यू , शुक्रवारी एक हजार २४६ बाधित; शहरी भागात चिंता वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ४५ हजार २७६ एवढी झाली असून, त्यातील ३३ हजार ६३६ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातुन सुटी देण्यात आली आहे.

नांदेडला २३ कोरोनाबाधितांचा मृत्यू , शुक्रवारी एक हजार २४६ बाधित; शहरी भागात चिंता वाढली

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यात शुक्रवारी (ता. दोन) प्राप्त झालेल्या चार हजार ३८१ अहवालापैकी एक हजार २४६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर २३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हाभरातील शासकीय व खासगी रुग्णालयात मिळून दहा हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी १५३ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. विशेष करून शहरी भागात कोरोना संसर्गाने चिंता वाढवली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ४५ हजार २७६ एवढी झाली असून, त्यातील ३३ हजार ६३६ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातुन सुटी देण्यात आली आहे. तामसा (ता. हदगाव) पुरुष (वय ३०), अर्धापूर पुरुष (वय ६५), मुखेड पुरुष (वय ७९), सरसम (ता. हिमायतनगर) महिला (वय ४५), सिडको नांदेड पुरुष (वय ६३), क्रांतीनगर नांदेड पुरुष (वय ५३), भोकर पुरुष (वय ५२), विवेकनगर नांदेड महिला (वय ६५), कौठा नांदेड पुरुष (वय ६७), गाडीपुरा नांदेड महिला (वय ३१), शिवाजीनगर पुरुष (वय ७५), निवघा (ता. मुदखेड) महिला (वय ७५), चौफाळा नांदेड पुरुष (वय ५०), पिरबुऱ्हाणनगर नांदेड पुरुष (वय ६५), सिडको नांदेड पुरुष (वय ४७), गुरुद्वारा नांदेड महिला (वय ५३), हदगाव महिला (वय ७२), डोणगाव (ता. मुदखेड) येथील पुरुष (वय ३२), नांदेड येथील पुरुष (वय ७५), गांधीनगर देगलूर पुरुष (वय ८६), लातूर फाटा नांदेड पुरुष (वय ६२), खामगाव (ता. लोहा) पुरुष (वय ७०), व्यंकटेश नगर नांदेड महिला (वय ८५) असे एकूण २३ रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले आहेत. 

हेही वाचा- अहो आश्चर्यम् ! शेळीने दिला दुतोंडी पिल्याला जन्म; नांदेडच्या नाव्हा येथील घटना

आरटीपीसीआर -  ॲन्टिजेन तपासणीद्वारे असे आढळले पॉझिटिव्ह

शुक्रवारी बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्रात ३३०, हदगाव ८१, लोहा १८, बिलोली तीन, नांदेड ग्रामीण १४, देगलूर आठ, कंधार एक, परभणी एक, मुदखेड नऊ, नायगाव ४८, हिमायतनगर आठ, यवतमाळ एक, धर्माबाद नऊ, अर्धापूर चार, हिंगोली दोन असे एकूण ५३७ तर ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्र ३७५, बिलोली २६, हिमायतनगर एक, मुदखेड दहा, परभणी तीन, नांदेड ग्रामीण १६, देगलूर १३, कंधार २७, उमरी ४१, यवतमाळ एक, अर्धापूर १८, धर्माबाद १३, किनवट ७०, मुखेड एक, पुणे एक, भोकर १६, हदगाव १०, लोहा ४७, नायगाव २० असे एकूण ७०९ व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत. 

हेही वाचा- स्वत: च्या लग्नपत्रिका वाटप करणाऱ्या नवरदेवावर काळाचा घाला; नांदेड- बारड रस्त्यावर अपघातात ठार

नांदेड कोरोना मीटर 

एकूण पॉझिटिव्ह - ४५ हजार २७६ 
एकूण बरे - ३३ हजार ६३६ 
एकूण मृत्यू - ८४३ 
शुक्रवारी पॉझिटिव्ह - एक हजार २४६ 
शुक्रवारी बरे - ९८३ 
शुक्रवारी मृत्यू - २३ 
उपचार सुरू - दहा हजार ५५८ 
अतिगंभीर रुग्ण - १५३