esakal | नांदेडला दिवसभरात २६ रुग्ण कोरोनामुक्त; ३५ अहवाल पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

गुरुवारी ७४३ अहवाल प्राप्त झाले. यातील ७०४ निगेटिव्ह, ३५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ हजार ७२६ इतकी झाली आहे.

नांदेडला दिवसभरात २६ रुग्ण कोरोनामुक्त; ३५ अहवाल पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची जितक्या प्रमाणात कमी होते तितक्याच प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची भर पडते. गुरुवारी (ता. सात) प्राप्त झालेल्या अहवालानुसार २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दुसरीकडे नव्याने ३५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४. ८० टक्के इतके आहे. 

बुधवारी (ता. सहा) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी गुरुवारी ७४३ अहवाल प्राप्त झाले. यातील ७०४ निगेटिव्ह, ३५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ हजार ७२६ इतकी झाली आहे. उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी गुरुवारी दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे तिसऱ्या दिवशी देखील जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा ५७६ वर स्थिर आहे. 

हेही वाचा- बेटी बचावचा संदेश देत नवरीची गावातून मिरवणुक; अर्धापूरात चर्चा ​

आतापर्यंत २० हजार ५९८ रुग्ण घरी परतले 

गुरुवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील - एक, महापालिकेंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण कक्षातील - ११, मुखेड - दोन, देगलूर - दोन, भोकर - दोन, अर्धापूर - दोन, कंधार - एक, माहूर एक, व खासगी रुग्णालयातील - चार असे २६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत २० हजार ५९८ रुग्ण कोरोनाचा उपचार घेऊन घरी परतले आहेत. 

हेही वाचा- नांदेड : पत्नी व मुलाच्या मृत्यूप्रकरणी पतिसह चार जणांना पोलिस कोठडी

 ३९६ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु 

नांदेड महापालिका क्षेत्रात - २२, नांदेड ग्रामीण - एक, कंधार - सात, किनवट - एक, अर्धापूर - एक, मुखेड - एक, परभणी - दोन, हिंगोली-एक असे ३५ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या २१ हजार ७२६ वर पोहचली असली, तरी यातील २० हजार ५९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ५७६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या ३५९ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी आठ रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ३९६ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु होती. 
 
नांदेड कोरोना मीटर 

एकूण पॉझिटिव्ह - २१ हजार ७२६ 
एकूण बरे - २० हजार ५९८ 
एकूण मृत्यू - ५७६ 
गुरुवारी पॉझिटिव्ह - ३५ 
गुरुवारी बरे - २६ 
गुरुवारी मृत्यू - शुन्य 
गंभीर रुग्ण - आठ 
स्वॅब तपासणी सुरु - ३९६ 
 

loading image