esakal | नांदेडला ३२५ रुग्ण कोरोनामुक्त, २५५ जण पॉझिटिव्ह; नऊ बाधितांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडला ३२५ रुग्ण कोरोनामुक्त, २५५ जण पॉझिटिव्ह; नऊ बाधितांचा मृत्यू

बुधवारी (ता. १६) ९१८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६१७ निगेटिव्ह आले तर २५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १२ हजार ४३७ वर जाऊन पोहचला आहे.

नांदेडला ३२५ रुग्ण कोरोनामुक्त, २५५ जण पॉझिटिव्ह; नऊ बाधितांचा मृत्यू

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून बुधवारी (ता. १६) प्राप्त झालेल्या अहवालात ३२५ रुग्‍ण कोरोना संसर्गातून बरे झाले. नव्याने २५५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर, उपचारादरम्यान नऊ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

मंगळवारी (ता. १५) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या अहवालापैकी बुधवारी (ता. १६) ९१८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६१७ निगेटिव्ह आले तर २५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १२ हजार ४३७ वर जाऊन पोहचला आहे. गेल्या २४ तासात चिवळी (ता. मुखेड) पुरुष (वय ५०), बसवंतनगर महिला (वय २१), अर्जापूर (ता. बिलोली) महिला (वय ४०), सखोजीनगर नांदेड पुरुष (वय ५२), धानोरा (ता. धर्माबाद) महिला (वय ५५), राधिकानगर नांदेड पुरुष (वय ६०), वजिराबाद नांदेड पुरुष (वय ६०), धानोरा (ता.नायगाव) महिला (वय ७०), गोकुंदा किनवट महिला (वय ८०) अशा नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूची संख्या ३३० झाली आहे. 

हेही वाचा- धक्कादायक : नांदेड जिल्ह्यातील ‘हा’ पाझर तलाव फुटून शेकडो हेक्टर शेती गेली खरडून

आठ हजार २३४ रुग्ण कोरोनावर मात

बुधवारी दिवसभरात विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील नऊ, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक शासकीय जिल्हा रुग्णालयात एक, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंनटाईनमधील १८२, किनवटला सहा, लोह्यात २८, धर्माबादला सात, माहूरला चार, मुखेडला २८, हदगावला एक, कंधारला २०, देगलूरात सहा, नायगावला आठ, बिलोलीत २३ व खासगी रुग्णालयातील दोन असे ३२५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत आठ हजार २३४ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. 

हेही वाचले पाहिजे- ट्रॅफिक पोलिसांची अशीही संवेदनशीलता ​

तीन हजार ८१० रुग्णांवर उपचार सुरु 

बुधवारी ज्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळुन आले त्यात नांदेड महापालिका हद्दीतील १२०, नांदेड ग्रामीणचे १४, अर्धापूरचे दहा, हदगावचे २०, कंधारचे दहा, किनवटचे १५, धर्माबादचे आठ, बिलोलीतील पाच, मुखेडचे १८, उमरीचे दहा, भोकरचे तीन, देगलूरचा एक, नायगावचे पाच, लोह्यातील सहा, मुदखेडचे चार, माहूरचा एक, हिंगोलीतील दोन, लातूरचा एक, यवतमाळचा एक आणि परभणीतील एक असे २५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या १२ हजार ४३७ वर पोहचली आहे. सध्या तीन हजार ८१० रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यापैकी ४५ जणांची प्रकृती गंभीर आहे. एक हजार ५४ संशयितांचा अहवाल येणे बाकी आहे. 

नांदेड कोरोना मीटर

एकुण पॉझिटिव्ह रुग्ण - १२ हजार ४३७
बुधवारी पॉझिटिव्ह - २५५
आत्तापर्यंत कोरोनामुक्त - आठ हजार २३४
बुधवारी कोरोनामुक्त - ३२५
एकूण मृत्यू - ३३०
बुधवारी मृत्यू - नऊ
सध्या उपचार सुरु - तीन हजार ८१०
प्रकृती गंभीर असलेले रुग्ण - ४५
अहवाल प्रलंबित - एक हजार ५४