esakal | नांदेड जिल्ह्याच्या ३५५ कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाचा गौरव

बोलून बातमी शोधा

नांदेड - 'बेटी बचाओ बेटी पढाओ' हा उपक्रमाच्या पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अशोक चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते सोमवारी औरंगाबादला करण्यात आले. }

मराठवाड्यातील मागासलेपणाचा अनुशेष दूर करण्यासाठी शासनस्तरावरुन मराठवाड्याच्या वाट्याला अधिक तरतूद कशी देता येईल, याचा प्रयत्न वित्त विभागाने करावा, असा आग्रह पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. नियोजन विभागाने ठरविलेल्या निकषातंर्गत शंभर कोटी रुपयांचा निधी वाढवून २०२१ - २२ साठी ३५५ कोटी रुपयांचा नांदेडचा आराखडा बैठकीत अंतिम करण्यात आला. नांदेड जिल्ह्याचा विस्तार व इतर निकष लक्षात घेऊन शंभर कोटी रुपयांची वाढ दिल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

नांदेड जिल्ह्याच्या ३५५ कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाचा गौरव
sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय प्रारुप आराखडा आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार आणि राज्याचे सावर्जनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता. १५) झाली. यावेळी नांदेड जिल्ह्याच्या ३५५ कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी देण्यात आली आहे. 

औरंगाबादला विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार सतिश चव्हाण, राम पाटील रातोळीकर, श्यामसुंदर शिदे, राजेश पवार, अपर मुख्य सचिव (नियोजन) देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, महापालिका आयुक्त डॉ सुनील लहाने, नियोजन उपायुक्त रवींद्र जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील अधिकारी, विभागप्रमुख यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा - परभणीत कॅनॉलवरील पक्की अतिक्रमणे काढली 
 

तरतूद वाढवून देण्याची पालकमंत्र्यांची मागणी 
मराठवाड्यातील मागासलेपणाचा अनुशेष दूर करण्यासाठी शासनस्तरावरुन मराठवाड्याच्या वाट्याला अधिक तरतूद कशी देता येईल, याचा प्रयत्न वित्त विभागाने करावा, असा आग्रह पालकमंत्री चव्हाण यांनी केला. जिल्ह्याला ६८ रुग्णवाहिकांची गरज असल्याची मागणी करुन एसडीआरएफ मधून याच्या खरेदीची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या आणि १६ तालुक्यांमध्ये साधलेला विस्तार, मानवनिर्देशांक या बाबी प्राधान्याने विचारात घेऊन जिल्ह्याच्या विकास आराखडा मागणी केल्याप्रमाणे तरतूद वाढवून देणे आवश्यक असल्याचेही सांगून त्यांनी श्री. पवार यांचे लक्ष वेधले. 

हेही वाचलेच पाहिजे - पेट्रोलचा भडका : परभणीत 97. 57 रुपये पेट्रोल लिटर तर डिझेल 87 रुपये

उपमुख्यमंत्र्यांनी दिला वाढवून निधी
शासनाने जिल्ह्यासाठी २५५.३२ कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा दिली. त्यानुसार २/३ गाभा क्षेत्रात १६१.७१ कोटी रुपये, १/३ बिगर गाभा क्षेत्रात ८०.८४ कोटी व पाच टक्के नाविन्य पूर्ण योजना व शाश्वत विकास ध्येय, मूल्यमापन व डाटा ऐन्ट्री असे एकूण १२.७७  कोटी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. शासनाच्या दिलेल्या नियतव्ययाच्या २५५.३२ कोटी मर्यादेत प्रारुप आराखडा तयार करुन आरोग्य, उर्जा, अंगणवाडी बांधकाम, ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, सामान्य शिक्षण, ग्रामविकास, पर्यटन/तीर्थस्थळ, पशुसंवर्धन, वने नगरविकास, गृहविभाग, तांडा विकास, सामान्य आर्थीक सेवा इत्यादी विविध योनजेसाठी दोनशे कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली होती. राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नियोजन विभागाने ठरविलेल्या निकषातंर्गत शंभर कोटी रुपयांचा निधी वाढवून २०२१ - २२ साठी ३५५ कोटी रुपयांचा नांदेडचा आराखडा बैठकीत अंतिम करण्यात आला. नांदेड जिल्ह्याचा विस्तार व इतर निकष लक्षात घेऊन शंभर कोटी रुपयांची वाढ दिल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

नांदेडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ला सदिच्छा 
नांदेड जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराचे कमी असलेले प्रमाण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून 'बेटी बचाओ बेटी पढाओ' हा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाच्या पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री पवार, पालकमंत्री चव्हाण आदींच्या हस्ते करण्यात आले. यासाठी जनजागृतीची मोहिम हाती घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली. जिल्हा प्रशासनातर्फे यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असून 'मुलीचे नाव, घराची शान' या विशेष उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले. गाव तिथे स्मशानभूमी, पंचतारांकीत आरोग्य केंद्र उपक्रम, अंगणवाडी विकासासाठी विशेष मोहिम, पंचतारांकीत शाळा या अभिनव उपक्रमांचीही उपमुख्यमंत्री पवार यांनी माहिती घेऊन शुभेच्छा दिल्या.