अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रासाठी साडेपाच कोटी मंजूर; चव्हाण

पालकमंत्री चव्हाण यांनी केले प्रयत्न
5 crore sanctioned for minority-dominated rural areas ashok Chavan nanded
5 crore sanctioned for minority-dominated rural areas ashok Chavan nandedAshok Chavan

नांदेड : अल्पसंख्याक बहुल भागाच्या विकासासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून नांदेड जिल्ह्यासाठी पाच कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच भोकर मतदारसंघासाठी ५० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजनेतून मंजूर केला आहे. या निधीतून दफनभूमी संरक्षण भिंत, सिमेंट रस्ते आदी कामे करण्यात येणार आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यासह भोकर मतदारसंघातील विकास कामांसाठी विविध योजनेतंर्गत कोट्यावधीचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला आहे. यातून अनेक विकासाची कामे करण्यात येत आहेत. अल्पसंख्यांक बहुल भागाचा विविध विकास कामातून विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.

नांदेड जिल्ह्यासाठी पाच कोटी ६० लाख मंजूर झाले आहेत. यात भोकर मतदारसंघासाठी ५० लाख मंजूर करण्यात आले आहेत. भोकर तालुक्यातील पिंपळढव येथील दफनभूमीसाठी सिमेंट रस्ता बांधण्यासाठी १५ लाख, अर्धापूर तालुक्यातील देळूब येथील दफनभूमी संरक्षण भिंत बांधण्यासाठी २० लाख तर मुदखेड तालुक्यातील बारड येथील दफनभूमी संरक्षण भिंत बांधण्यासाठी १५ लाख रुपयाचा निधी राज्य शासनाने अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजनेतून मंजूर केला आहे. यातून अल्पसंख्यांक बहुल भागाची विकासाकडे वाटचाल होणार असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले असून निधी मंजूर झाल्याबद्दल अल्पसंख्यांक समाजाच्या नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com