नांदेड कारागृहातील ६० कैद्यांची सुटका

file photo
file photo

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध जगभरात लॉकडाउन सुरू आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने हा संसर्ग वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. म्हणून उच्च न्यायालयाने राज्यातील काही कैद्यांना जामिनावर सोडण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे नांदेड कारागृहातील जवळपास ६० कैद्यांची सुटका करण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी सांगितले. 

नांदेड येथील कारागृहात १८० कैदी शिक्षा भोगत होते. यात काही गंभीर गुन्ह्यातील कैद्यांचा समावेश होता. परंतु सध्या कोराना या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. एकाच छताखाली असणाऱ्यांच्या संपर्कामुळे याचा धोका अधिक असल्याने राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात राज्यातील विविध कारागृहातील सात हजार कैद्यांना जामिन दिला होता. तर काहींची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. 

कारागृहातील ६० कैद्यांना सोडण्यात आले

त्यानंतरही राज्यातील अनेक कारागृह कैद्यानी खचाखच भरलेली असल्याची माहिती गृहविभागाला मिळाली. त्यांनी न्यायालयाला विनंती करून दुसऱ्या टप्प्यात पुन्हा १७ हजार कैद्यांना सोडण्यात यावे असे कळविले होते. यावरून उच्च न्यायालयाने आपल्या अधिनस्त न्यायालयाला एका पत्राद्वारे कळविले होते. त्यावर शिक्कामोर्तब होऊन राज्यातील विविध कारागृहातील कैद्यांना सोडण्यात आले. 

नांदेड कारागृहात अजूनही १५० कैदी शिक्षा भोगत आहेत

नांदेड कारागृहातील १८० कैद्यांपैकी दुसऱ्या टप्प्यात ६० कैद्यांची सुटका करण्यात आली. यात खून, खूनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, हाणामारी आदी गुन्ह्यात अडकलेल्या कैद्यांनाही जामीन देण्यात आला. मात्र अत्याचार, मोक्का, आर्थीक गुन्हा, देशद्रोह यासारख्या गुन्ह्यातील कैद्यांना सोडण्यात आले नाही. नांदेड कारागृहात अजूनही १५० कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यात महिला कैद्यांचाही समावेश आहे. 
कोवीड -१९ चा प्रादूर्भाव होउ नये यासाठी खबरदारी म्हणून हा पर्याय निवडण्यात आला आहे. विविध गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या कैद्यांना न्यायालयाने जामिन दिला असून त्यांनी या काळात कुठलीही अनुचीत घटना घडवु नये असे त्यांच्या जामिन अर्जात उल्लेख करण्यात आलेला आहे.

येथे क्लिक कराया’ कारणामुळे आईने फेकले बाळाला कंन्टेनरखाली...
  
शारिरीक अंतर ठेवून बॅरेकचे काम सुरू 

कारागृहामधील पाच बॅरेकचे काम लॉकडाउनमुळे संथगतीने सुरू असून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. शारिरीक अंतर ठेवून बॅरेकचे काम सुरू असल्याचे अधिक्षक रामराजे चांदणे यांनी सांगितले. लॉकडाउन नसते तर आजपर्यंत दोन ते तिन बॅरेकचे काम पुर्णत्वास आले असते असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com