esakal | नांदेड जिल्ह्यासाठी 80 व्हेंटिलेटर उपलब्ध- खासदार चिखलीकर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड येथील शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली होती.

नांदेड जिल्ह्यासाठी 80 व्हेंटिलेटर उपलब्ध- खासदार चिखलीकर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोणाचा वाढता संसर्ग लक्षात घेता गंभीर लक्षण असणाऱ्या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या व्हेंटिलेटरची नांदेड जिल्ह्यात मोठी कमतरता होती. त्यामुळे नांदेड येथील शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली होती. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 80 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत. 

नांदेड जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. सद्य परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या पुढे आहे. देशातील कोणत्याही राज्यात कोरोनाचा इतका संसर्ग वाढला नाही जितका संसर्ग महाराष्ट्रात वाढला आहे. महाराष्ट्रातील महाआघाडीच्या सरकारमुळे राज्यातील जनता कोरोनाच्या घशात ढकलली गेली. राज्यात आरोग्यसेवा सक्षम नसताना मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून जनतेच्या रक्षणासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. किंबहुना राज्यात शासकीय रुग्णालयात आवश्यक तेवढय प्रमाणात व्हेंटिलेटरही उपलब्ध नव्हते. यात नांदेड जिल्हा अपवाद नाही. 

हेही वाचा - ‘लक्ष्मी’च्या लग्नाकरिता ‘साईप्रसाद’ची मदत

शासकीय रुग्णालयात बोटावर मोजता येतील इतकेच व्हेंटिलेटर 

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात बोटावर मोजता येतील इतकेच व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यामुळे अती गंभीर लक्षण असणाऱ्या करोना बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य विभागासमोर मोठ्या अडचणी होत्या. ज्यांनी नांदेडच्या जनतेच्या बळावर राज्यातील अनेक सन्मानाची पद भूषविली सत्ता भोगली त्यांनी केवळ शासकीय इमारती बांधल्या मात्र त्यात आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या नाहीत. केवळ देखाव्याचे जुमाले उभारण्याचे काम करणाऱ्या नेत्यांनी नांदेडच्या जनतेच्या रक्षणासाठी आत्यवश्यक असणारे व्हेंटिलेटर उपलब्ध केले नव्हते. 

जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर

परंतु ज्या जनतेने आपल्याला विश्वासाने निवडून दिले. ज्या जनतेने आपल्यावर विश्वास टाकला त्या जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात व्हेंटिलेटरची कमतरता असल्याची बाब लक्षात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित विभागाकडे व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत पाठपुरावा केला. अवघ्या महिनाभराच्या पाठपुरावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 80 लिटर मंजूर केले आहेत.

येथे क्लिक करा - कोरोना ब्रेकिंग - नांदेडला दिवसभरात ३० पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

कोरोणाचा संसर्ग लवकरात लवकर आटोक्यात आणता यावा

जिल्ह्यातील आरोग्य विभागात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर उपलब्ध होण्याची ही ऐतिहासिक घटना आहे. जिल्ह्यातील कोरोणा बाधित रुग्ण मृत्युमुखी पडू नये, कोरोणाचा संसर्ग लवकरात लवकर आटोक्यात आणता यावा, कोरोनामुक्त भारत झाल्यानंतरही ज्या ज्या रुग्णांना जेव्हा- जेव्हा व्हेंटिलेटरची गरज भासेल तेव्हा तेव्हा त्यांना वेंटीलेटर सहज उपलब्ध व्हावेत, नागरिकांची आरोग्य सुखकर असावे यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. 

loading image