Nanded : पावणे तेरा लाख जणांनी घेतली कोरोना लस

Nanded : पावणे तेरा लाख जणांनी घेतली कोरोना लस
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील १०३ लसीकरण केंद्रावर रविवारपर्यंत (ता. १९ सप्टेंबर) एकूण १२ लाख ७६ हजार ६८२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता. २० सप्टेंबर) कोविशिल्डचे दहा लाख ७१ हजार ३० डोस तर कोव्हॅक्सीनचे तीन लाख दोन हजार ८० डोस याप्रमाणे एकुण १३ लाख ७३ हजार ११० डोस प्राप्त झाले (Corona Vaccination In Nanded) आहेत. जिल्हा आरोग्य विभागातर्फे कोविडचे (Corona) लसीकरण व्हावे, या दृष्टीने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. जिल्ह्यातील १०३ केंद्रावर १८ ते ४४ वयोगटासह ४५ वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. नांदेड महापालिका (Nanded) क्षेत्रातील श्री गुरु गोविंद जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, अरब गल्ली, खडकपुरा, रेल्वे हॉस्पिटल या १९ केंद्रावर कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी शंभर डोस उपलब्ध आहेत.

Nanded : पावणे तेरा लाख जणांनी घेतली कोरोना लस
नांदेड जिल्ह्यात दोन मुले, एक मुलीला पळवून नेले


उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या १६ केंद्रावर कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी शंभर डोस उपलब्ध आहेत. तर ग्रामीण भागात ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी शंभर डोस देण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या १२ ते १६ आठवडे म्हणजेच सुमारे ८४ दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करत आहे.

जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस १८ ते ४४ वयोगटासाठी व ४५ वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
- डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nanded
Turning Grief into Determination: Abhimanyu Cracks MPSC Revenue Assistant Exam
Police Raid Grocery Store, Trace Larger Gutkha Stock Worth Lakhs in Nanded City
Mother’s hard work and son's determination lead to PSI success
Marathi News Esakal
www.esakal.com