९ वर्षाच्या बालिकेवर ७५ वर्षीय व्यक्तीचा अत्याचार

विशेष पोक्सो न्यायाधीशांनी ठोठावली तीन वर्षांची शिक्षा
९ वर्षाच्या बालिकेवर ७५ वर्षीय व्यक्तीचा अत्याचार
९ वर्षाच्या बालिकेवर ७५ वर्षीय व्यक्तीचा अत्याचार sakal

नांदेड : एका ऊस तोड कामगाराच्या नऊ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या ७५ वर्षीय व्यक्तीला अतिरिक्त सत्र विशेष पोक्सो न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी तीन वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.अधिक माहिती अशी की, मांडवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने तक्रार दिली होती. ते आणि त्यांचे कुटुंबिय सर्व ऊसतोड कामगार आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांचे पती दुसऱ्या राज्यात ऊसतोडीच्या कामाला गेले होते. सदर महिला कापूस वेचण्याच्या कामाला जात असे.

१४ नोव्हेंबर २०१९ रोजी सदर महिला सायंकाळी घरी आली तेव्हा तिची नऊ वर्षाची बालिका वाकडे पाय ठेवून चालत असल्याचे दिसले. याबाबतचे कारण विचारले असता शेजारी राहणाऱ्याने मला त्रास दिसा. मला सिताफळ देतो म्हणून घरी बोलावले आणि माझ्यावर अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. त्यानुसार सदर महिलेने मांडवी पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे यांच्याकडे तपास होता.

त्यानंतर संतोष केंद्रे यांनी ७५ वर्षीय किसन धर्मा मुन्नेश्वरला अटक करून पुराव्याची साखळी तयार केली. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यात ११ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्याच्या आधारे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी किशन मुनेश्वरला तीन वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com