esakal | जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला कोठडी 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी मगनपूरा भागात मंगळवार (ता. २३) केली. चोरट्याला पोलिस कोठडी मिळाली. 

जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला कोठडी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका औषध निर्मात्यास लुटणाऱ्या सारईत गुन्हेगारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी मगनपूरा भागात मंगळवार (ता. २३) केली. चोरट्याला पोलिस कोठडी मिळाली. 

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ता. १२ जून रोजी रात्री एकच्या सुमारास बजरंग कॉलनीत राहणारे औषध निर्माता भास्कर मोहनराव जाधव (वय ३८) हे कर्तव्यावरुन घरी जात होते. ते नमस्कार चौकात आल्यानंतर त्यांना दोन चोरट्यांनी अडविले. त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील नगदी अडीच हजार रुपये व सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल जबरीने हिसाकावून घेतला. तसेच पोलिसात तक्रार दिली तर ठार मारण्याची धमकी दिली. मात्र या प्रकरणी भास्कर जाधव यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भास्कर जाधव यांनी चोरट्यांचे वर्णन पोलिसांना सांगितले.

हेही वाचा -  म्हणून मी बहिणीला मारले; भावाने केला खुनाचा उलगडा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी केली कारवाई

हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांनी गुप्त माहितीवरुन चोरट्यांचा माग काढला. आसना बायपास परिसरात हे दोन्ही चोरटे असल्याचे समजले. मात्र त्या ठिकाणी ते नव्हते. अखेर मंगळवारी (ता. २३) रात्री मगनपूरा भागातून जबरी चोरी करणाऱ्या किरण बंडे याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडील दुचाकीही जप्त केली. मात्र त्याचा साथिदार पोलिसांना सापडला नाही. अटक केलेला किरण बंडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याला विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर याच पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडून अजून काही जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याला विमानतळ पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. 

नागरिकांनी सावधानता बाळगावी

नांदेड शहरात सध्या लॉकडाउन असल्यामुळे पोलिस यंत्रणा सर्व बंदोबस्तकामी आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावर किंवा चौकात पोलिस गस्तीवर दिसत नाहीत. यामुळे चोरट्यांचा वावर वाढत असून पोलिसांचे त्यांच्या हालचालीवर लक्ष आहे. आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा सक्षम असून नागरिकांनीही अशा संशयास्पद व्यक्ती आपल्या आजूबाजूला किंवा परिसरात फिरत असतील तर जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी केले आहे.  

loading image