esakal | नांदेड विभागात विनातिकिट रेल्वे प्रवाशांवर कारवाई, सहा लाख वसूल
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांविरुद्ध नांदेडच्या दक्षण रेल्वे विभागाच्या वतीने तिकिट तपासणी पथक तयार केले आहे.

नांदेड विभागात विनातिकिट रेल्वे प्रवाशांवर कारवाई, सहा लाख वसूल

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोनाच्या Corona) काळातही नांदेडच्या दक्षिण-मध्य रेल्वेच्या (South-Central Railway Division Nanded) वतीने विशेष रेल्वे (आरक्षित) सुरु केलेल्या आहेत. त्यात पुन्हा अनारक्षित रेल्वेही सुरु केलेल्या आहेत. दरम्यान रेल्वेमधून विनातिकिट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर, रेल्वे विभागाने तिकिट तपासणीसाठी पथकाची नियुक्ती केली. या पथकाने १० ते १५ जुलै या पाच दिवसांच्या कालावधीत सहा लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे. विनातिकिट प्रवाशांना चाप लावण्यासाठी नांदेडच्या दक्षिण रेल्वे विभागाच्या वतीने धडक तिकीट तपासणी मोहीम सुरु केली आहे. १० ते १५ जुलैदरम्यान एक हजार २८५ विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करत सहा लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आलेला आहे. दक्षिण-मध्य रल्वे, नांदेड (Nanded) विभागातर्फे विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. action against non ticket travelers in nanded railway division glp88

हेही वाचा: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक जय पाटील यांगत पाच दिवसांमध्ये नांदेड रेल्वे विभागात धडक तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली. त्यांच्या सोबत इतर तिकीट तपासनीस आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे अधिकारी आणि जवानही सहभागी होते. या तिकीट तपासणी मोहिमेत नांदेड ते मुदखेड, नांदेड ते आदिलाद, नांदेड ते मनमाड (Manmad), नांदेड ते अकोला (Akola) अशा विविध भागात धावणाऱ्या रेल्वेमध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात तब्बल एक हजार २८५ विनातिकीट प्रवाशी सापडले. तसेच अनियमित प्रवास करणे आणि परवानगी शिवाय जास्त समान घेवून जाण्यामुळे काही प्रवाशांवर कार्यवाही करण्यात आली. या अनियमित / विनातिकीट प्रवाशांकडून सहा लाख १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही तिकीट तपासणी मोहीम विनातिकीट प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांमध्ये नैतिक भीती निर्माण करण्याकरिता आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्या करिता करण्यात आल्याचे जय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: पैठण तालुक्यातील शाळेला पाण्याचा वेढा, इमारतीला धोका

प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वे विभाग तत्पर आहे. प्रवाशांनी योग्य तिकिट घेऊनच प्रवास करून होणाऱ्या कार्यवाहीलरा टाळावे, तसेच रेल्वे प्रवासात कोविड-१९ च्या नियमांचे तंतोतंत पालन करावे.

- जय पाटील, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड

loading image