रविवारी ९२ बाधितांची भर, १२१ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

शिवचरण वावळे
Sunday, 18 October 2020

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १८ हजार ७९ एवढी झाली आहे. यातील १५ हजार ९१८ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण एक हजार ५६५ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील ४४ बाधितांची प्रकृती अतीगंभीर आहे. 

नांदेड - जिल्ह्यात १२१ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रविवारी (ता.१८) रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर ९२ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४७ तर ॲटिजनकिट्स तपासणीद्वारे ४५ बाधित आले आहेत. 

एकूण ७६६ अहवालापैकी ६५७ अहवाल निगेटिव्ह आले असून जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १८ हजार ७९ एवढी झाली आहे. यातील १५ हजार ९१८ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण एक हजार ५६५ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील ४४ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

हेही वाचा- दुष्काळ मदत पाहणीला आमदाराच्या नाराजीची फोडणी ​

१२१ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी 

या अहवालात तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवारी (ता.१७) खासगी रुग्णालयात सिडको येथील महिला (वय ५५), नरसी नायगाव पुरुष (वय ६७), आणि हदगाव घोगरी येथील पुरुष (वय ३७) उपचारादरम्यान यांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या ४८३ इतकी झाली आहे. रविवारी बरे झालेल्या बाधितांमध्ये विष्णुपूरी शासकीय रुग्णालय- दोन, बिलोली -चार, धर्माबाद -एक, किनवट- एक, मुदखेड- एक, जिल्हा रुग्णालय- पाच, देगलूर-दोन, लोहा-एक, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन- ८७, खासगी रुग्णालय - १७ असे १२१ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

हेही वाचले पाहिजे- सोशल मिडीयाच्या ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडची दखल ​

एक हजार ५६५ बाधितांवर औषधोपचार 

नांदेड मनपा क्षेत्र -३१, अर्धापूर -एक, मुदखेड - तीन, कंधार- चार, धर्माबाद - एक, नांदेड ग्रामीण - दोन, भोकर- एक, किनवट - एक, नायगाव - एक, हिंगोली - दोन असे ४७, तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र - २२, भोकर -एक, हदगाव -एक, मुखेड - तीन, नायगाव- पाच, बिलोली - दोन, नांदेड ग्रामीण- चार, मुदखेड - एक, किनवट - दोन, कंधार- दोन, धर्माबाद- एक, हिंगोली -एक असे ४५ बाधित आढळले. जिल्ह्यात एक हजार ५६५ बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. 
रविवारी सद्यस्थितीत रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे ४८, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे ९०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ८५ एवढी आहे. 

कोरोना मीटर ः 

रविवारी पॉझिटिव्ह- ९२ 
रविवारी कोरोनामुक्त- १२१ 
रविवारी मृत्यू- तीन 
एकूण पॉझिटिव्ह - १८ हजार ७९ 
एकूण कोरोनामुक्त- १५ हजार ९१८ 
एकूण मृत्यू संख्या- ४८३ 
रविवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ४०९ 
उपचार सुरु- एक हजार ५६५ 
अती गंभीर रुग्ण- ४४ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Added 92 victims on Sunday 121 corona sufferers discharged after medical treatment Nanded News