Nanded Muncipal Corporation : सभागृह नेतेपदी ॲड. महेश कनकदंडे यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Muncipal Corporation

सभागृह नेतेपदी ॲड. महेश कनकदंडे यांची निवड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेची सोमवारी (ता. २२) डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात महापौर जयश्री पावडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच बैठक आॅफलाइन झाली. या बैठकीत सभागृह नेतेपदी ॲड. महेश कनकदंडे यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड करण्यात आली. दरम्यान, उपमहापौर मसूदखान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

हेही वाचा: प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा - HC

कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षात आॅनलाइन सभा घ्यावा लागल्या होत्या. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे महापौर जयश्री निलेश पावडे यांच्या अध्यक्षतेखाली आॅफलाइन सभा सोमवारी सकाळी अकरा वाजता घेण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर मसूदखान, स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, प्रभारी नगरसचिव अजितपालसिंग संधू, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. आजच्या सभेत १४ विषयांवर चर्चा करण्यात आली आणि त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

या सभेत कॉँग्रेसचे नगरसेवक ॲड. महेश कनकदंडे यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाल्यामुळे त्या जागेवर नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात कॉँग्रेसचे सात आणि भाजपच्या एका सदस्याचा समावेश आहे. ज्येष्ठ नगरसेवक अब्दुल हफीज, सुनंदा सुभाष पाटील, महेंद्र पिंपळे, राजू काळे, रजिया बेगम बाबू खान, फरहत सुलताना खुर्शिद अन्वर जहागिरदार, सलीमा बेगम नुरूल्ला खान (सर्व कॉँग्रेस) आणि भाजपच्या शांताबाई गोरे यांची निवड झाली.दरम्यान, सभागृह नेतेपदी कॉँग्रेसचे ॲड. महेश कनकदंडे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर उपस्थित पदाधिकारी व अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. सभागृहात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या विषयावर जोरदार आणि वादळी चर्चा झाली. आयुक्त डॉ. लहाने यांनी महापालिकेतंर्गत ५० टक्के लसीकरण झाल्याची माहिती देत सभागृहातही अनेकांनी लस घेतली नसल्याचे निर्दशनास आणून दिले. यावेळी काही पदाधिकारी आणि सदस्यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शोभा तोष्णीवाल यांच्याबाबतच्या तक्रारी मांडल्या. नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी मागणी यावेळी करण्यात आल्यानंतर आयुक्त डॉ. लहाने यांनी या प्रकरणी लक्ष घालून सुविधा देण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

समन्वय ठेऊन काम करणार

कॉँग्रेसचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतरांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन. महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी व सदस्यांमध्ये समन्वय ठेऊन काम करणार आहे. सभागृहात महत्वाच्या विकासकामांवर आणि प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासोबतच सभागृहाचा नावलौकिक वाढविण्यावर आपले विशेष प्राधान्य राहणार असल्याची माहिती नूतन सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे यांनी दिली.

loading image
go to top