esakal | Video - तब्बल तीन महिन्यानंतर ज्ञानेश्वरी आज आईला भेटणार
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

नांदेडचे नायब तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि ‘साईप्रसाद’च्या सहकार्याने दोघेही पुणे येथील घरी शुक्रवारी (ता.१५) सकाळी परतले असून, तब्बल तीन महिन्यानंतर ज्ञानेश्‍वर आपल्या आईला भेटणार आहे.  

Video - तब्बल तीन महिन्यानंतर ज्ञानेश्वरी आज आईला भेटणार

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : लॉकडाउनमुळे पुणे येथील संतोष उपासे व त्यांची अडीच वर्षाची मुलगी ज्ञानेश्वरी नायगाव येथे नातेवाइकाकडे आले होते. मात्र, २२ मार्चपासून प्रवासी वाहतूक बंद पडल्याने तेथेच अडकून पडले. अखेर नांदेडचे नायब तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि ‘साईप्रसाद’च्या सहकार्याने दोघेही पुणे येथील घरी शुक्रवारी (ता.१५) सकाळी परतले असून, तब्बल तीन महिन्यानंतर ज्ञानेश्‍वर आपल्या आईला भेटणार आहे.  

कोरोना महामारीमुळे अख्खे जग हैराण झालेले आहे. अनेकांचा रोजगार हिरावून घेतला असून, आपल्या नातेवाइकाकडे आलेलेही दोन महिन्यांपासून अडकून पडलेले आहेत. हाताला काम नसल्याने अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या गावी जमेल तसे परतत आहे. महाराष्ट्र शासनाने या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था केलेली आहे. परंतु, महाराष्ट्रातील अडकलेल्यांसाठी कुठल्याही प्रकारचे ठोस पावले उचलली जात नसल्याने, अडकलेल्यांच्या नजरा आता आपल्या घराकडे लागलेल्या आहेत.

हे देखील वाचाच - जाणून घ्या, ‘कोरोना’नंतरची शिक्षणव्यवस्था कशी असेल

पुणे येथील संतोष उपासे हे आपल्या पत्नीसह तीन महिन्यांपूर्वी नायगाव येथील मावशीकडे आले होते. श्री. उपासे हे पुण्याला एका कंपनीमध्ये काम करतात.लॉकडाउन लागण्यापूर्वी पत्नी कांचन पुण्याला गेली. संतोष उपासे व ज्ञानेश्‍वर हे दोघेही मावशीकडेच थांबले. दोन-चार दिवसांनी पुण्याला जाण्याचा त्यांचा बेत होता. दरम्यानच्या काळात म्हणजे २४ मार्चपासून लॉकडाउन जाहीर केल्याने दोघेही नायगाव येथेच अडकून पडले होते. दोन वर्षाच्या ज्ञानेश्‍वरीला आईकडे जाण्याची ओढ लागल्याने संतोष उपासे हे ज्ञानेश्‍वरीला घेऊन सहा दिवसांपूर्वी नांदेडच्या तहसिल कार्यालयात आले होते. 

तब्बल तीन महिन्यांनी होणार मायलेकीची भेट
महसूल प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांना संतोष उपासे यांची व्यथा सांगितली. त्यांच्या सूचनानुसार नायब तहसिलदार सारंग चव्हाण यांनी संतोष उपासे आणि अडीच वर्षाची ज्ञानेश्‍वरी यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली.

येथे क्लिक कराच - अवकाळीचा हाहाकार; वीज पडून चार ठार

सहा दिवसांपासून तहसिल कार्यालयामध्ये वास्तव्यास असलेले संतोष उपासे आणि ज्ञानेश्‍वर यांची पुण्याला जाण्याची व्यवस्था होऊ शकेल काय? अशी विचारणा सारंग चव्हाण यांनी यांनी ‘साईप्रसाद’ परिवाराकडे केली होती. त्यानुसार ‘सार्प्रसाद’ परिवारातील सदस्याने पुढाकार घेतला आणि शुक्रवारी (ता.१५) दोघांनाही घेऊन पुण्याकडे प्रस्थान केले. त्यामुळे तब्बल तीन महिन्यानंतर मायलेकीची भेट होणार आहे.

महसुल प्रशासनाचा पुढाकार कौतुकास्पद
कोरणामुळे कशा प्रकारची संकटे कुटुंबावर येत आहेत आणि कशी मायलेकीची ताटातूट झाली आहे याचे हे जिवंत उदाहरण म्हणजे संतोष उपासे आणि ज्ञानेश्‍वरीचे आहे. महसूल प्रशासनाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून या मायलेकीची भेट घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असेच आहे. 
- साईप्रसाद प्रतिष्ठान, नांदेड