नांदेड शहरात पुन्हा गोळीबार, रात्री उशीरापर्यंत तपास सुरु होता

गोळीबार
गोळीबार

नांदेड : शहरातील (Nanded) श्रीनगर भागात बुधवारी (ता.११) रात्री पावणेदहाच्या सुमारास गोळीबाराची (Firing) घटना घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले असून उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. शहरातील श्रीनगर (Crime In Nanded) भागात पंचशील ड्रेसेसजवळ रामराव पवार मार्ग आहे. त्या ठिकाणी एका कार्यकर्त्यांच्या घरासमोर येऊन काही अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. त्याची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूचे नागरिक जमा झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, भाग्यनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.

गोळीबार
समोरील दृश्याने कुटुंबियांनी फोडला हंबरडा, आवाजाने शेजारी धावले

नेमका काय प्रकार घडला हे आता लगेच सांगता येणार नाही. गोळीबार व्यक्तीवर करण्याचा उद्देश होता की हवेत, त्यामागचे कारण आदींची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com