Malegaon News : कृषिमाल विक्रीसाठी शेतकरी, विपणन कंपन्यांमध्ये करार ; शेतकरीमित्र कंपनीचे संचालक कृषिभूषण भगवान इंगोले यांची माहिती

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाच्या विक्रीसाठी १५ पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या आणि विपणन कंपन्या यांच्यात सामंजच करारासाठी मुंबईत कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक झाली. त्यात नांदेड येथील शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचा समावेश होता.
nanded
nandedsakal

मालेगाव : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाच्या विक्रीसाठी १५ पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या आणि विपणन कंपन्या यांच्यात सामंजच करारासाठी मुंबईत कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक झाली. त्यात नांदेड येथील शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचा समावेश होता. यावेळी उत्पादनासंबंधी काही करार झाल्याची माहिती शेतकरी मित्र कंपनीचे संचालक कृषिभूषण भगवान इंगोले यांनी दिली.

शाश्वत योगिक सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन केलेले अन्नधान्य डाळी भाजीपाला एक सात्विक पद्धतीने उत्पादन घेतले जाते. ज्यामुळे खाणाऱ्याचे आरोग्य चांगले राहते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल यांना पुणे मुंबई ठिकाणी बाजारपेठ मिळाला तर शेतकऱ्यांना दहा-वीस टक्के अधिक चा लाभ होईल.

nanded
Malegaon Crime : दारु सोडण्याच्या वादातून मेव्हण्याकडून जावयाचा खून

मुंबईत झालेल्या झालेल्या या कराराप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या करारामुळे नांदेडसह राज्याच्या विविध भागातील तनिष्का व अन्य महिला शेतकरी आपला कृषीमाल ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बिगबास्केटसह, किसान कनेक्ट, जैन इरिगेशन,अनेक नामवंत कंपन्यांना थेट विकू शकतील. भरड धान्याचे पदार्थ अंगणवाडी पोषण आहारासाठी देण्याचा निर्णयही लवकरच होईल, अशी आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन- ''मित्रा'' संस्था, कृषी विभाग, ''स्मार्ट'' प्रकल्प आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन यांच्या वतीनेही घेण्यात आली. शेतकऱ्यांची गरज ओळखून शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीची बदलत्या काळानुसार बदलत्या गरजेनुसार कार्पोरेट जगतासोबत वाटचाल करत आहे, नांदेड आत्माचे प्रकल्प संचालक‌ नोडेल अधिकारी भास्कर कोळेकर, हेही उपस्थित होते या बैठकीत मका ज्वारी का बाजरी कापूस कडधान्य सोयाबीन फळे, भाजीपाला आदी शेतकरी व उत्पादकाच्या ५९ कंपन्यांनी सहभागी झाल्या होत्या त्यात शेतकरी मित्र फार्मर प्रोड्यूसर कंपनीसह, सत्यप्रकाश ॲग्रो हिंगोली,दत्तप्रयात ॲग्रो परभणी,भुसेवा ॲग्रो,खंडोबाॲग्रो आधीचा समावेश होता.

शेतीचे क्षेत्र सबसिडीतून नुकसान भरपाईतून बाहेर काढण्यासाठी विविध उपाय योजना बरोबरच शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला, सेंद्रिय गुळ ,हळद ,डाळी , फळ, भाजीपाला ,थेट ग्राहकांना विक्रीसाठी पाठवावा.

-भगवान इंगोले, संचालक- शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी, मालेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com