आजपासून अजंता एक्स्प्रेस सुरु, पूर्णा-पटना आणि हैदराबाद - जयपूर विशेष रेल्वेला मुदतवाढ 

प्रमोद चौधरी
Tuesday, 1 December 2020

मंगळवारी (ता. एक) आजपासून अजंता एक्स्प्रेस सुरु करण्यात आली आहे. तर पूर्णा - पटना आणि हैदराबाद - जयपूर विशेष रेल्वेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या तिन्ही रेल्वेच्या वेळेत बदल तसेच नंदीग्राम विशेष एक्स्प्रेसमध्ये तीन अधिकचे डब्बे जोडण्यात आल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली. 

नांदेड :  लॉकडाउनमुळे रेल्वे विभागाच्या वतीने काही विशेष रेल्वे सोडल्या जात असून, काही रेल्वेच्या वेळेत तात्पूरते बदल करण्यात येत आहेत. मंगळवारी (ता. एक) आजपासून अजंता एक्स्प्रेस सुरु करण्यात आली आहे. तर पूर्णा - पटना आणि हैदराबाद - जयपूर विशेष रेल्वेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या तिन्ही रेल्वेच्या वेळेत बदल तसेच नंदीग्राम विशेष एक्स्प्रेसमध्ये तीन अधिकचे डब्बे जोडण्यात आल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली. 

(०७०६४ सिकंदराबाद - मनमाड अजंठा विशेष रेल्वे) एक डिसेंबरपासून सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून सायंकाळी १८.५० वाजता सुटेल, नांदेड ००.२२, औरंगाबाद ०५.४० मार्गे मनमाड येथे सकाळी ०८.०५ वाजता पोहोचेल. तर गाडी संख्या ०७०६३ मनमाड - सिकंदराबाद अजंठा विशेष रेल्वे दोन डिसेंबरला मनमाड रेल्वे स्थानकावरून रात्री २०.५० वाजता सुटेल औरंगाबाद - २२.४५, नांदेड -०३.०५, मार्गे सिकंदराबाद येथे सकाळी ०८.५० वाजता पोहोचेल. 

हेही वाचा - Video - नांदेड : अखेर मुक्ताबाईच्या डोक्यावरील ओझं उतरवलंच

(०२७२० हैदराबाद - जयपूर उत्सव विशेष रेल्वे) दोन ते २८ डिसेंबर दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी हैदराबाद रेल्वे स्थानकावरून रात्री २०.२५ वाजता सुटेल आणि नांदेड -०१.२० , हिंगोली, ०३.२५, अकोला - ०५.४५ मार्गे जयपूर येथे सकाळी ०५.२५ वाजता पोचेल. (०२७१९ जयपूर - हैदराबाद उत्सव विशेष रेल्वे) चार ते ३० डिसेंबर दरम्यान दर बुधवारी आणि शुक्रवारी जयपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी १५.२० वाजता सुटेल आणि अकोला-१५.२०, हिंगोली १७.००, नांदेड -१९.३० मार्गे हैदराबाद येथे मध्य रात्री ००.४५ वाजता पोहोचेल. (०७६१० पूर्णा ते पटना उत्सव विशेष रेल्वे) चार डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान दर शुक्रवारी पूर्णा रेल्वे स्थानकावरून दुपारी १४.१० वाजता सुटेल. नांदेड-१४.४२, आदिलाबाद-१८.२०, नागपूर-००.२५ मार्गे पटना येथे रात्री २३.२० वाजता पोहोचेल. 

हे देखील वाचाच - विधायक बातमी : लोकसहभागातून तयार होणारा पुल पूर्णत्वाकडे एकीचे ज्वलंत उदाहरण

(०७६०९ पटना ते पूर्णा उत्सव विशेष रेल्वे) सहा डिसेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान दर रविवारी पटना रेल्वे स्थानकावरून सकाळी सात वाजता सुटेल. नागपूर-०४.४०, आदिलाबाद- ११.०५, नांदेड -१४.२२ मार्गे पूर्णा येथे दुपारी १५.२५ वाजता पोहोचेल. 

(०११४१-०११४२ आदिलाबाद-मुंबई सीएसटी-आदिलाबाद विशेष रेल्वेमध्ये एक डिसेंबरपासून ते ३१ डिसेंबर दरम्यान अतिरिक्त दोन द्वितीय शयनयान कक्ष (स्लीपर क्लास) आणि एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी (ए.सी. टू टायर ) असे एकूण दिन अतिरिक्त डब्बे वाढविण्यात आले आहेत. या गाडीत एकूण २१ डब्बे असतील. 

येथे क्लिक कराच - Success story: पळसा येथील शेतकऱ्याने एक हेक्टर शेतीत रोपवाटिका व फळबागेतुन घेतले चांगले उत्पन्न
  
देवगिरी, राज्यराणी विशेष रेल्वेही सुरु होणार 
नांदेड-मुंबई (०७६११, ०७६१२) ही राज्यराणी विशेष रेल्वे (ता.तीन, ता.चार) पासून सुरु होणार आहे तर सिकंद्राबाद-मुंबई (०७०५८, ०७०५७) ही देवगिरी विशेष रेल्वे (ता.पाच, ता.सहा) पासून सुरु होणार असल्याचे पत्रक रेल्वे विभागाने सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे. त्यामुळे अजून दोन रेल्वेची भर पडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajanta Express Starts Today South Railway Division Nanded News