Akshay Bhalerao Murder Case : अक्षय भालेराव हत्या प्रकरणातील जातीवादी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या; रामदास आठवले

ही निंदनीय आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो असे ना.रामदास आठवले यांनी आपल्या तीव्र भावना काळविल्या आहेत
 Ramdas Athawale
Ramdas Athawale esakal
Updated on

Akshay Bhalerao Murder Case - नांदेड मधील बोनडार गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून निर्दोष भीमसैनिक अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करणाऱ्या जातीवादी मानसिकतेच्या निर्दयी आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

 Ramdas Athawale
Pune Corporation : पालिकेला टॅक्स हवाय! मग आधी द्या या सुविधा!

भालेराव यांच्या हत्येचा आणि बोनडार गावातील दलित वस्तीवर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे आपण तीव्र निषेध करीत असल्याचे आठवले यांनी सांगितले आहे.फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून एका बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या केली जाते.

 Ramdas Athawale
Mumbai Crime : स्वछतागृहाच्या तारा उचकटून त्याने तेथून पळ काढला,कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करत केली अटक

ही निंदनीय आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो असे ना.रामदास आठवले यांनी आपल्या तीव्र भावना काळविल्या आहेत.

दिवंगत अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांपैकी 7 जणांना अटक झाली असून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा.

दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत तात्काळ द्यावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देऊन कुटुंबाचे पूनर्वसन करावे.अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी जेणे करून पुन्हा असा गुन्हा कोणी करू नये असा कायद्याचा धाक निर्माण होईल अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com