Video : चिखलीकरांच्या खासदारकीची अशीही वर्षपूर्ती      

chiklikar  e-sakal.jpg
chiklikar e-sakal.jpg

नांदेड : नांदेड लोकसभा निवडणूकीच्या निकालाला एक वर्ष पूर्ण झाले. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिला कार्यक्रम एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनाच्या आगारात साजरा झाला होता. चिखलीकर यांच्या खासदारकीचा एक वर्षाचा कार्यकाळ शनिवारी (ता. २३) पूर्ण झाला. एस. टी. आगारातील हमालांना अन्न-धान्याचे किट वाटप करुन चिखलीकरांच्या खासदारकीची वर्षपूर्ती हमालांच्या सानिध्यात साजरी करण्यात आली.

हमालांना धान्याचे किट वाटप
कोरोना महामारीच्या संकटामुळे लॉकडाऊनमध्ये सर्व जनता घरातच बंद होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलीता देण्यात आल्याने एसटी बस सेवा कालपासून सुरु झाली. लॉकडाउनच्या काळात उपासमारीची वेळ आलेल्या एसटी आगारातील हमालांना धान्याचे किट वाटप करुन खासदार चिखलीकर यांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

शपतविधीनंतर पहिला कार्यक्रम येथेच  
कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या समाजातील गोरगरीब लोकांचे आपण काही देणे लागतो, याचे भान ठेवत आपल्या खासदारकीची वर्षपूर्ती नांदेडच्या बसस्थानकात हमालाच्या सानिध्यात साजरी केली. खासदार चिखलीकर यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा नांदेड येथे आले. यानंतर पहिल्याच दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह आगारात काम करणाऱ्यांना मी तुमच्या पाठिशी आहे, असे आश्वासन दिले होते. 

वंचितांना धान्याचे कीट वाटप 
वर्षपूर्तीपूर्वीच्या दोन महिन्यांपूर्वी देशासह राज्यात करोना विषाणूजन्य आजाराने थैमान घातल्यामुळे राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या टाळेबंदीचा फटका सर्वसामान्यांसह राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसह तेथील कामगारांना बसला आहे. आपणही काही समाजाचे देणे लागतो, या उदात्त हेतुने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्यातील वंचितांना धान्याचे कीट वाटप केले. भाजपचे पदाधिकारी अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांच्यावतीने हमालांना मास्क व हँडग्लोजचेही वाटप करण्यात आले.
 
सत्तर लोकांना धान्याच्या किटचे वितरण
शपथ घेतलेल्या दिवशी नांदेड बसस्थानकात  कार्यरत असलेल्या कामगारांचे काही देणे लागतो, हे ध्यानात ठेऊन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खासदारकीच्या वर्षपूर्ती बसस्थानकातील हमालांच्या सानीध्यात करण्याचा संकल्प केल्यामुळे शनिवारी (ता. २३) भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हमालांना धान्याच्या कीटचे वितरण केले. यात हमाल, सफाईदार, स्वच्छक, सुरक्षा रक्षक अशा सत्तर लोकांना खासदार चिखलीकर यांच्यावतीने प्रविण पाटील चिखलीकर, भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या हस्ते धान्याच्या किटचे वितरण करण्यात आले. 

कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती

या कार्यक्रमास नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे पाटील, संजय वाळवे, आगारप्रमुख पुरूषोत्तम व्यवहारे, नरसिंह निमनवाड, राजकुमार टिपराळे, लक्ष्मण देशमाने, दिनेश ठाकूर, सरचिटणीस विजय गंभीरे, उपाध्यक्ष उभनलाल यादव, अशोक धनेगावकर, व्यंकट मोकले, सूर्यकांत कदम, विशाल शुक्‍ला, प्रल्हाद उमाटे, संगीता झुंजारे, महादेवी मठपती यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com