
नांदेड : ‘कोरोना’च्या सावटाने सर्वच जण आज घरात आहेत. अशा परिस्थितीत ‘कोरोना’शी लढा देत अनेकजण देश वाचविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. ‘कोरोना’ योद्ध्यांबद्दल आॅनलाइन चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून चित्र रेखाटन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. निमित्त होते ते आनंदवन मित्र परिवाराने आयोजित केलेल्या आॅनलाईन चित्रकला स्पर्धांचे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आनंदवन मित्र परिवार, नांदेड यांच्या वतीने शुक्रवारी (ता.एक) आॅनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत देशभरातून १८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अतिशय गंभीर अशा ‘कोरोना’ला हरविण्याचा संदेश देणारे चित्र रंगवून मनाचा ठाव घेतला. त्यापैकी ८० स्पर्धकांनी आॅनलाइन व्हॉटसॲपच्या माध्यमातून आयोजकांच्या अटी शर्तीनूसार चित्र पाठविले होते. यापैकी तिघांची निवड करण्यात आली़. यामध्ये प्रथम दहा हजार एक रुपयांचे पारितोषिक देऊन त्यांच्या चित्रांचा सन्मान करण्यात आला.
ऋषिकेश संतोष खानजोडे प्रथम
यात वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील ऋषिकेश संतोष खानजोडे यास दहा हजार एक रुपयांचे प्रथम पारितोषिक तर औरंगाबादचा रवींद्र वाकळे आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील अमोल प्रभाकर सालमोठे यांना सात हजार एक रुपयाचे द्वितीय पारितोषिक विभागून देण्यात आले, तर तृतीय बक्षीस औरंगाबाद (सिडको) प्रेरणा दामोदर टाकळगावकर यांना देण्यात आले.
कोरोनाशी लढणाऱ्या योद्धाविषयी कतृज्ञता
एकासरस एक संकल्पना राबवून ‘कोरोना’च्या लढ्यात सहभागी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस, महसूल व इतर सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याविषयी कतृज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर अनेकांनी ‘कोरोना’चा सामना करण्यासाठी जनजागृतीपर चित्रही रेखाटले. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांच्या चित्रांचे चित्रकला क्षेत्रातील दोन दिग्गज परीक्षकांनी परीक्षण करून गुण दिले. त्यानूसार सदर विजेत्यांची निवड करण्यात आल्याची माहिती आनंदवन मित्र परिवाराकडून देण्यात आली.
हेही वाचा- रुग्णालयातील ‘त्या’ गर्भवती महिलेचा मृत्यू
डॉक्टर अन् पोलिसच देशाचे कवच
आपली माणसं आणि पर्यायाने आपला देश वाचविण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता २४ तास अहोरात्र कष्ट उचलणाऱ्या डॉक्टर, पोलिस आणि सर्व यंत्रणांच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या एकासरस एक कलाकृती स्पर्धकांनी सादर केल्या आहेत. डॉक्टर, पोलिस आणि शासन, प्रशासनाच्या खांद्यावरील वाढता ताण लक्षात घेवून आपण घरातच थांबून त्यांना मदत करू या, असा संदेश देणारी कलाकृतीही मनाला भावणारी आहे. त्याचबरोबर ‘कोरोना’च्या भयंकर राक्षसास रोखण्यास सज्ज असलेला सफाई कामगार, पोलिस, डॉक्टर यांच्याविषयी रेखाटलेली कलाकृती सदर यंत्रणेला पाठबळ देण्याचा संदेश देते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.