रुग्णालयातील ‘त्या’ गर्भवती महिलेचा मृत्यू

शिवचरण वावळे
Sunday, 3 May 2020

प्रत्येक ‘स्त्री’ ही मातृत्वाला आसूसलेली असते, मुल जन्माला येणे ही तिच्या आयुष्यातील सर्वात सुखद क्षण असतो. यासाठी तिला असाह्य वेदनेतून जावे लागते. वसमत तालुक्यातील एका २४ वर्षीय गर्भवती प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाली. तिला मातृत्व प्राप्त  होणारच इतक्यात अघटीत घडले. तिने रुग्णालयातून पळुन जाण्याचा प्रयत्न केला अन् होत्याचे नव्हते झाले. 
 

नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या २४ वर्षीय गर्भवती महिलेस शनिवारी (ता.दोन) तपासणीसाठी प्रसूती वार्डात दाखल करण्यात आले होते. तिला टेबलवर घेणार इतक्यात तिने रुग्णालयातून पळून जाण्यासाठी बाहेर धाव घेतली. पळण्याच्या प्रयत्नात पायऱ्यावरुन तिचा पाय घसरला आणि खाली पडली. पडल्याने डोके आणि पोटास गंभीर जखम झाली. प्रकृती नाजुक असल्याने तिला तत्काळ आपघात विभागात दाखल करण्यात आले होते. 

वसमत तालुक्यातून आलेल्या या गर्भवती महिलेवर रूग्णालयातील डॉक्टर्सनी तातडीने उपचार सुरु केले. पोटाला गंभीर मार लागल्याने गर्भातील बाळाचे ठोके बंद पडल्याचे निदान झाले. बाळ जन्माला येण्यापूर्वीच बाळाने गर्भातच मृत्यू झाला; तर अर्ध्या तासाने ‘त्या’ महिलेचाही दुर्देवी मृत्यू झाल्याने रूग्णालय परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

हेही वाचा- भयंकरच : गुरुद्वाराचे ‘ते’ कर्मचारी फरारच, अहवाल मात्र कोरोना पॉझिटिव्ह

मानसोपचार तज्ज्ञांकडे देखील उपचार सुरु होते

रेणापूर (ता. वसमत, जि.हिंगोली) येथील रिंकु रोहित चौरंगे (वय २४) ही नऊ महिन्याची गर्भवती असल्याने तिला नांदेडला रुग्णालयात पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे मागील दीड महिन्यापासून तिची मानसिक स्थिती बरी नसल्याने तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडे देखील उपचार सुरु होते. दरम्यान, प्रसूतीची तारीख जवळ आल्याने त्या महिलेस वसमत येथून नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. 

हेही वाचा- लॉकडाउन : गृहकलहामध्ये वाढ, घरातून निघून आलेल्या महिलेलेचे समुपदेशन

नर्स- डॉक्टर धावले पण..

शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रिंकुला प्रसूती विभागात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तला तपासणीसाठी टेबलवर घेणार इतक्यात ती बाहेर पळुन गेली.  बाहेर पळून जात असताना तेथील सुरक्षारक्षकांसह रुग्णालयातील नर्स व डॉक्टरांनीही या महिलेला अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गर्भवती महिलेचा पळण्याचा वेग जास्त होता. परिणामी, पळण्याच्या वेगात त्या महिलेचा पाय पायऱ्यावरुन उतरत असताना घसरला. पडल्यानंतर देखील ती महिला उठुन पुन्हा पळण्याचा प्रयत्नात असतानाच पुन्हा तिचा तोल गेला आणि ती जोराने खाली कोसळली.  यात तिच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली. महिलेच्या डोक्याला व पोटाला गंभीर मार लागल्याने गर्भवती महिलेची चब्येत चिंताजनक झाली होती. 

पाय घसरून पडल्याने बाळ - तिचाही मृत्यू

प्रसूती विभागात तपासणीसाठी टेबलवर घेत असताना नऊ महिण्याची गर्भवती अचानक पळुन जाण्याच्या प्रयत्नात पायऱ्या उतरत होती. तिला थांबवण्यचा प्रयत्न केला पण ती महिला थांबली नाही. वेगाने पायऱ्या उतरताना तिचा पाय घसरून पडल्याने बाळाचा गर्भातच तर काही अंतराने तिचाही मृत्यू झाला. 
-डॉ. एस.आर. वाकोडीकर, प्रमुख, प्रसूती विभाग. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'That' Pregnant Woman Died At The Hospital Nanded News