
गौरव वाळिंबे
नांदेड : भारतीय सनातन परंपरेत लिंगपूजेला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. आगमशास्त्रानुसार प्रत्येक गावात शिवालय असावे आणि मरळक बु. येथील प्राचीन श्री विमलेश्वर महादेव मंदिर हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे. नांदेड शहरापासून केवळ १० किलोमीटर अंतरावर असलेले हे भव्य हेमाडपंती मंदिर, रामायण व महाभारत काळापूर्वीपासून अस्तित्वात असल्याचा उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतो. हे मंदिर ‘अनंतशायी विमलेश्वर’ या नावानेही ओळखले जाते.