शाळा सुरू करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या - कुठे ते वाचा 

photo
photo

नांदेड : शासन निर्देशानुसार शाळा सुरू करण्याची पूर्व तयारीचा शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी मंगळवारी (ता. २२) आढावा घेतला. शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीमध्ये सभापती श्री. बेळगे यांनी आधिक पटसंख्येच्या शाळा सुरू करण्याची घाई करता येणार नाही, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सूचना दिल्या.

कोरोनाचे गांभीर्य राखून खबरदारीच्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करून आवश्यक त्या ठिकाणच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्या शासन परिपत्रकानुसार मंगळवारी (ता. २२) शिक्षण सभापती बेळगे यांनी शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे कंटेनमेंट झोन वाढले आहेत. शहरी भागाच्या कंटेनमेंट झोन क्षेत्रातील शाळा सुरू करणे जिकरीचे ठरणार असल्याचे सूर बैठकीत उमटला. 

सभापती श्री. बेळगे यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यांचे संरक्षण प्रथमस्थानी ठेवून जास्तीच्या पटसंख्येच्या शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असा सल्ला दिला. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून विद्यार्थी पटसंख्येसह भौतिक सुविधांबाबत शाळांची तीन प्रपत्रांमध्ये माहिती मागविण्यात आली आहे. शनिवारी (ता. २७) माहिती वरिष्ठांना कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. सभापती श्री. बेळगे यांनी शाळेत सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात यावेत. 

शाळा इमारती सॅनिटाइज करण्यात याव्यात याशिवाय गरज भासल्यास किमान आठवड्याला शाळा इमारती सॅनिटाइज करण्याच्या सूचना देत शाळा सुरू करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना दिल्या. शिक्षणाधिकारी श्री. दिग्रसकर यांनी शाळा व्यवस्थापन समित्या, ग्रामपंचायत कार्यालय, दक्षता समित्यांना शाळा सुरू करण्याबाबत खबरदारीच्या सूचना जारी करण्यात येणार असल्याचे सांगून सभापती श्री. बेळगे यांच्या सुचनेनुसार तातडीने बैठकीतच तालुका स्तरावर संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेशही शिक्षणाधिकारी श्री. दिग्रसकर यांनी जारी केले.

येथे क्लिक कराटप्याटप्याने शाळा सुरू करण्याच्या हालचाली - कुठे ते वाचा?
 
तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांचा तपशील
नांदेड - शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, बालासाहेब कुंडगीर, अर्धापूर - श्री. गंजेवार, हदगाव - श्री. बनसोडे, हिमायतनगर - श्री. मठपती, माहूर - श्री. नाईकवाडे, किनवट - श्री. आळंदे, मुदखेड - श्री. आमदूरकर, उमरी - श्रीमती मांदळे, श्रीमती बागवाले, धर्माबाद - श्री. सुकाळे, श्री. ढवळे, बिलोली - श्री. सलगर, नायगाव - श्री. बसवदे, श्रीमती अवातिरक, देगलूर - श्री. येरपुलवार, मुखेड - श्री. शेटकर, कंधार - श्री. पोकळे, लोहा - श्री. सिरसाट, श्री. बाजगिरे, भोकर - श्री. भरकर, श्री. गोणारे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com