esakal | अर्धापुरात प्रियकराने प्रियसीला जीवंत पेटविले; चार जणाविरुध्द गुन्हा दाखल 

बोलून बातमी शोधा

file photo

प्रियकरास अटक करण्यात आली असून न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सदरील घटना ता. 26 फेब्रुवारीला सायंकाळी घडली होती. यात फिर्यादी महिला गंभीर  भाजली आहे.

अर्धापुरात प्रियकराने प्रियसीला जीवंत पेटविले; चार जणाविरुध्द गुन्हा दाखल 

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : शहरातील नवी आबादी परिसरातील आक्सा काॅलनित एका महिलेस तिच्या प्रियकराने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी प्रियकरासह चौघांविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात रविवार (ता. चार ) गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी प्रियकरास अटक करण्यात आली असून न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सदरील घटना ता. 26 फेब्रुवारीला सायंकाळी घडली होती. यात फिर्यादी महिला गंभीर  भाजली आहे.

या बाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील आॅक्सा काॅलनित राहणा-या एका 22 वर्षीय महिलेचे शहरातील एका तरुणाशी प्रेम संबंध होता. तो तिला भेटायला येत असे ही बाब तिच्या पतीच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने सोडून दिली. यानंतर सदरील महिला प्रियकरास विवाह करण्याचा तगादा लावत होती. प्रियकर घरगुती कारण सांगून लग्न करण्याचे टाळाटाळ करित होता. पिडीत महिला प्रियकराच्या घरी (ता. 26 फेब्रुवारी) जावून लग्न कर अन्यथा पेट्रोल टाकून जाळून घेते. असे म्हणून रागाच्या भरात अंगावर पेट्रोल टाकून घेतले. तेंव्हा प्रियकराने तु कशाला जाळून घेते मीच तुला जाळून टाकतो असे म्हणून महिलेच्या हातातील काडीपेटी घेवून पेटवून दिले. यात सदरील महिला गंभीररित्या जळून जखमी झाली. तिला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा - एकाच कुटुंबातील तब्बल सहा सदस्य मुके; बोलता येत नाही मात्र त्यांचा संवाद पाहून...

या घटनेतील आरोपी सदरील महिलेस भेटण्यासाठी रुग्णालयात गेला व त्याने मी तुझ्या सोबत लग्न करतो व तुझ्या मुलांचा सांभाळ करतो व चांगल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतो असे सांगितल्यावर सदरील महिलेने ता. 27 फेब्रुवारीला आपण रागाच्या भरात स्वतः ला पेटवून घेतल्याचा जवाब दिला. पण त्यानंतर आरोप प्रियकर सदरील महिलेस भेटण्यासाठी आला नाही. अशी फिर्याद पिडीत महिलेने दिल्यावरुन आरोपी शेख जावेद शेख चिन्नु मियाँ (वय 23 ) याच्यासह अन्य तिघाविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक कपील आगलावे करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे