esakal |  अर्धापूर : शहराच्या विविध भागात कच-याचे ढिग, सत्ताधारी नगरसेवकात बेबनाव
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

घनकचरा जमा करण्याचे कंत्राट देण्यावरून पालक मंत्र्यांच्या आढावा बैठकीत सत्ताधारी नगरसेवकात चांगलीच गरमागरम चर्चा झाली होती.पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नियमाप्रमाणे कार्यवाही करून चांगले काम करणा-या संस्थेला काम देण्याच्या सुचना केल्या होत्या.

 अर्धापूर : शहराच्या विविध भागात कच-याचे ढिग, सत्ताधारी नगरसेवकात बेबनाव

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : शहरातील घनकचरा जमा करण्यासाठी कोणत्या संस्थेला काम द्यावे यावर सत्ताधारी नगरसेवकात एकमत नसल्यामुळे ज्या संस्थेने कमी किंमतीची निविदा भरलेल्या संस्थेला कामाचा आदेश देण्यासाठी विलंब झाल्याने शहरातील विविध भागात कच-याचा ढिग जमा झाले आहे. गेल्या दहा दिवसापासुन कचरा जमा करण्याचे काम बंद आहे. घनकचरा जमा करण्याचे कंत्राट देण्यावरून पालक मंत्र्यांच्या आढावा बैठकीत सत्ताधारी नगरसेवकात चांगलीच गरमागरम चर्चा झाली होती. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नियमाप्रमाणे कार्यवाही करून चांगले काम करणा-या संस्थेला काम देण्याच्या सुचना केल्या होत्या.

अर्धापूर शहरातील घनकचरा जमा करने,वाहतूक करने,प्रक्रिया करून पुन्हा वापर करने व विलगीकरण करणे आदी कामाचे कंत्राट देण्याची निविदा प्रक्रिया गेल्या महिण्यात सुरू झाली होती.शहरातील घनकचरा जमा करण्याचे काय गेल्या सहा वर्षापासून एकाच संस्थेला देण्यात आले होते.या संस्थेशी आनेकांचे हितसंबंध निर्माण झाले. कच-यात फायदा दिसू लागल्याने कही नगरसेवकांचे डोळे फिरले.कच-यांचे सोने करण्याची  संधी खुनवत होती. त्यामुळे काही नगरसेवकांचा कच-यावर डोळा आहे आशी नागरिकात चर्चा आहे.

हेही वाचा कोरोना ‘खाटां’ची खरी खोटी, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील ४० खाटांचे गणित जुळेना

स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याने काही नगरसेवक नाराज

घनकचरा जमा करण्यासाठी निविदा प्रक्रियेत सहा संस्थाने सहभाग नोंदविला होता.या सहा संस्थेपैकी  संस्था पात्र ठरल्या.पुण्याच्या स्वामी  सव्हसिसेस या संस्थेने सर्वात कमी निविदा भरल्याने या संस्थेला कामाचा आदेश देने आपेक्षित होते .पण या संस्थेने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याने काही नगरसेवक नाराज झाले या विषयी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सत्ताधारी नगरसेवकात गरमागरम चर्चा झाली.बैठक संपल्यावर ही तहसील कार्यालयाच्या परिसरात चर्चा झाली.

दिरंगाईमुळे शहरातील स्वच्छतेचे काम ठप्प

दरम्यान सत्ताधारी नगरसेवकात एकवमत नसल्यामुळे संबंधित संस्थेला कामाचा आदेश देण्यासाठी विलंब झाला.तर या विषयांवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी  (ता आठ) वेब बैठकीत चर्चा झाली. या दिरंगाईमुळे शहरातील स्वच्छतेचे काम ठप्प झाले आहे. शहरातील सर्व भागात कच-याचे ढिग जमा झाले आहे.

येथे क्लिक करानांदेड : जिल्ह्यात बिबट्याचा संचार, हल्ल्यात वासरु ठार, शेतकरी भयभीत

महिन्याला बारा लाख खर्च :

शहराचा विस्तार व विकास होत आहे. नागरिकांना सुविधा देण्यासाठी नगरपंचायतीची दमछाक होत असून बहुतांश सुविधा ठेकेदारा मार्फत देण्यात येतात.घनकचरा जमा करणे,वाहतूक,पुर्नवापर,प्रक्रिया करणे यासाठी एक कोटी 57 लाख 38 हजार  निविदा काढण्यात आली आहे. शहरातील स्वच्छतेवर दरमहा बारा लाखाहून जादा खर्च होणार आहे गेल्या सहा वर्षापासून एकाच संस्थेला कंत्राट मिळाले होते.या संस्थेशी आनेकांचे हितसंबंध निर्माण झाले आहे.ज्या संस्थेला 2020- 21 साठी निविदा टेंडर मिळाले आहे या संस्थेने मोठ्या नगरपालिकेचे काम केले आहे. तर हो नाही करता गुरूवारी उशिरा आदेश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.

संपादन - प्रल्हाद कांबळे