
अर्धापूर शहरांत उमटले असून जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून दानवेंचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. तसेच या चितावणीखोर वक्तव्या बद्दल देशातील तमाम शेतक-यांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
अर्धापूर ( जिल्हा नांदेड) : दिल्लीत सुरु आसलेल्या शेतकरी आंदोलना बाबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवें यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद अर्धापूर शहरांत उमटले असून जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून दानवेंचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. तसेच या चितावणीखोर वक्तव्या बद्दल देशातील तमाम शेतक-यांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
केंद्र सरकारने तीन कायदे पारित केले असून हे कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी गेल्या 17 दिवसापासून आंदोलन करित आहेत. या शेतक-यांच्या आंदोलनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून शेतक-यांच्या भावना दुखविल्या आहेत. याचे तिव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत.
हेही वाचा - खळबळजनक घटना : नांदेडच्या दोन तुरुंगाधिकाऱ्यांसह शिपाई निलंबीत- अधीक्षकांना शिवीगाळ करणे पडले महागात
शहरातील बसवेश्वर चौकात जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे यांच्या नेतृत्वाखाली केंदीय राज्यमंत्री रावसाहेब दानवें यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. तसेच प्रचंड घोषणाबाजी केली. शेतकरी आपल्या हक्कासाठी लढत आसतांना केंद्रातील एका जबाबदार नेत्याने अन्नदात्या बाबत बेजबाबदारपणे वक्तव्य न शोभनारे आहे. याबाबत त्यांनी देशातील तमाम शेतक-यांची माफी मागावी आसे प्रतिपादन बबन बारसे यांनी केले. तसेच पेट्रोल ,डिझेलची दरवाढ व तिन्ही कायदे त्वरीत मागे घेण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात बाजार समितीचे संचालक दत्ता पाटील पांगरीकर, प्रल्हाद इंगोले, तालुकाप्रमुख संतोष कपाटे, उपतालुका प्रमुख संतोष कदम, सदाशीव इंगळे, नागेश सरोळे, अशोक डांगे, कैलास कल्याणकर, शिवप्रसाद दाळपुसे, काझी सल्लाउद्दीन, शेख रफीक, विठ्ठल कल्याणकर, रमेश क्षिरसागर, सुदाम चौरे, सुनील बोबडे ,कपील कदम आदी शिवसैनिक सहभागी झाले.
संपादन - प्रल्हाद कांबळे