esakal | नागपूर परीक्षा केंद्र गाठण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांची झाली धावाधाव

बोलून बातमी शोधा

Nanded News}

कोरोनाचा धोका ओळखून विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकचे परिक्षा केंद्र देणे अपेक्षित असताना मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना नागपूर परिक्षा केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्र जवळ करण्यासाठी शनिवारी (ता. २७) सकाळपासून धावाधाव करावा लागत होती.

नागपूर परीक्षा केंद्र गाठण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांची झाली धावाधाव
sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जवळपास पहिल्या टप्यात विविध पदाच्या पाच ते आठ हजार रिक्त जागांसाठी भरतीपूर्व परिक्षा रविवारी (ता. २८) घेण्यात येत आहे. कोरोना काळात घेतली जाणारी ही विद्यार्थ्यांसाठीची जणू सत्वपरीक्षाच आहे. 

कोरोनाचा धोका ओळखून विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकचे परिक्षा केंद्र देणे अपेक्षित असताना मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना नागपूर परिक्षा केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्र जवळ करण्यासाठी शनिवारी (ता. २७) सकाळपासून धावाधाव करावा लागत होती. 
नांदेड - नागपूर ही नंदीग्राम रेल्वे सध्या आदिलाबादपर्यंत सोडण्यात येत आहे. तर नांदेड ते पटणा (पूर्णा), धनबाद - कोल्हापूर व हावडा एक्सप्रेस ह्या साप्ताहीक गाड्या अनुक्रमे गुरुवार, शुक्रवार आणि सोमवार असा सोडण्यात येत आहेत. 

हेही वाचा- जिल्हा सहकारी बॅंकेची रनधुमाळी, कार्यक्रम जाहीर, अर्धापूर तालुक्यातून एक सदस्य निवडून जाणार.

एसटी महामंडळ तिसरी बस...

त्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एकही गाडी त्यांच्या उपयोगी पडणारी नसल्यामुळे व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना नांदेड ते नागपूर असा आठ ते नऊ तासाचा प्रवास करावा लागणार असल्याने त्यांना एसटी महामंडळाच्या बसवर अवलंबुन राहावे लागत आहे. सध्या नांदेडहून नागपूरला अशा दोन शिवशाही बस सोडण्यात येतात. या स्लीपर कम सिटींग व्यवस्था असलेल्या या बसमध्ये ४४ सीट उपलब्ध आहेत. त्यासाठीचे लागणारे आरक्षण पूर्ण झाल्याने व विद्यार्थ्यांची मागणी बघुन नांदेड एसटी महामंडळ विभागाच्या वतीने तिसरी बस सोडण्याची तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. 

विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाली असती

मात्र, असे असले तरी परीक्षा केंद्र जवळ करण्याच्या हेतुने विद्यार्थी वाटेल ते मार्ग शोधत आहेत. सध्या विदर्भात कोरोनाचे सर्वाधित रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे कोरोना काळाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परिक्षार्थी विद्यार्थ्यांना लेटरपॅडवर शुभेच्छा संदेश देण्याऐवजी सरकारने विद्यार्थ्यांसाठी प्रवासाच्या दृष्टीने जवळचे परीक्षा केंद्र दिले असते, तर विद्यार्थ्यांची होणारी धावपळ कमी झाली असती. शिवाय विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोनाची भीती देखील कमी झाली असती, अशा भावना पालक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. 

हेही वाचा- नांदेड : गडगा ग्रामपंचायतमध्ये १८ लाखाचा अपहार; अखेर ग्रामसेवक पठाणवर गुन्हा

एसटीच्या प्रवाशी पासची विक्री
 
नांदेडहून जवळ असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कडक लॉकाडाउन असल्याने विद्यार्थ्यांना नागपूर किंवा वर्धा असे दोन पर्याय खुले आहेत. त्यातही नेमक्या गाड्यांची वेळ माहित नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी जी गाडी मिळेल. त्या एसटी बसने प्रवास करण्याचे ठरवत थेट चार दिवसांचा बाराशे रुपयांचा पास काढला आहे. त्यामुळे नांदेड एसटी महामंडळाच्या तिजोरीत एक लाख रुपयाची भर पडली आहे.