esakal | रेमडेसिव्हिर इंजेक्शन विकणाऱ्या युवकाला अटक; दोन इंजेक्शन जप्त- नांदेड एफडीएची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

रेमडेसिव्हीर

रेमडेसिव्हिर इंजेक्शन विकणाऱ्या युवकाला अटक; दोन इंजेक्शन जप्त- नांदेड एफडीएची कारवाई

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना बाधीत रुग्णांसाठी काही अंशी लाभदायक ठरणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच काही महाभाग या इजेंक्शनचा काळा बाजार करत असल्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून उघडकीस आळे आहेत. त्या प्रकरणात शहराच्या विमानतळ व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुन्हा रविवारी असाच प्रकार उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) च्या पथकाने एकाला डी मार्ट परिसरातून रविवारी (ता. दोन) सांयकाळी ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शन जप्त केले. त्याच्याविरुद्ध भाग्यनगगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेला दिगंबर बाबुराव फुले हा डीमार्ट परिसरात रेमडेसिव्हीर इंजेक्शन चढ्या दराने विकत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. यावरुन सहाय्यक आयुक्त रोहित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षआ अधिकारी प्रविण काळे आणि माधव निमसे यांनी सापळा लावला. यावेळी पथकाने आपलाच एख बनावट ग्राहक तयार करुन दिगंबर फुलेकडे घेऊन पाठविले. फुले हा इंजेक्शन देत असतानाचा त्याला ताब्यात घएतले. त्याच्याकडून दोन रेमडेसिव्हीर इंजेक्शन जप्त केले.

हेही वाचा - रमजान विशेष : लैलतुल कदर पवित्र रात्रीची इबादतने रमजानच्या तिसऱ्या पर्वास प्रारंभ

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांच्या पथकाने डीमार्ट परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली.त्यानंतर त्याला भाग्यनगर पोलिस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरुन रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडच्या काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शन सर्वात आवश्यक असल्याचा आभास तयार झाला आहे. खरेतर हे इंजेक्शन जीवन वाचविणारे औषध नाही, तरीपण इंजेक्शनची वाढती मागणी असल्यामुळे त्याचा काळाबाजार होत आहे.

loading image
go to top