
नांदेड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एमआयएम पक्ष लढविणार आहे. त्या दृष्टीने तयारीही सुरू केल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी (ता. १६) दिली. यासंदर्भात धोरण निश्चित करण्यापूर्वी नांदेड येथे बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.