esakal | मराठवाड्यात बुलेट ट्रेनसाठी करणार पाठपुरावा - अशोक चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर (जि.नांदेड) - भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या  वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित अशोक चव्हाण, व सभासद.

मराठवाड्यात बुलेट ट्रेनसाठी करणार पाठपुरावा - अशोक चव्हाण

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : मराठवाड्यात (Marathwada) दळणवळणाची साधने उपलब्ध व्हावीत व वेगाने प्रवास व्हावा, यासाठी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला (Nagpur-Mumbai Samruddhi Highway) जोडण्यासाठी रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात बुलेट ट्रेन धावू शकते, तर मराठवाड्यात का धावू शकत नाही, असा प्रश्न उपस्थित करून मराठवाड्यात बुलेट ट्रेन धावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. भाऊरावच्या स्थापनेपासून शेतकऱ्यांच्या एकही पैसा ठेवला नाही व यापुढे ठेवण्यात येणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम अशोक चव्हाण (Public Works Minister Ashok Chavan) यांनी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या (Bhaurao Cooperative Sugar Factory) वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी (ता.२९) दिली. भाऊरावच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, साखरेला भाव जादा मिळाला तरच ऊसाला जादा भाव देता येते. भविष्यात (Nanded) साखरेचे उत्पन्न कमी करून इथेनॉलचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. जो कारखाना पैसे देतो त्याच कारखान्याविरूद्ध विरोधक तक्रारी करून बातम्याचे फोटो छापून आणतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. साखरेला गेल्या काही दिवसात चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल.

हेही वाचा: नांदेड-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण करू: भागवत कराड

तसेच केंद्राकडील थकबाकी मिळाल्यास कारखान्यासाठी सोईचे होईल. यंदा इसापूर धरण आतापर्यंत ८१ टक्के भरले असून योग्य नियोजन व काटकसरीने पाण्याचा वापर केल्यास मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. कारखाना चांगला चालण्यासाठी भागभांडवलात वाढ होणे आवश्यक असून शासनाच्या आदेशानुसार वाढीव भागभांडवलाची रक्कम जमा करण्याचे आवाहन श्री.चव्हाण यांनी केले. भाऊरावची २८ वा वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत, आमदार अमरनाथ राजुरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नरेंद्र चव्हाण, पप्पू पाटील कोंढेकर, उपाध्यक्ष प्रा.कैलास दाड, कार्यकारी संचालक श्याम पाटील, संचालक प्रविण देशमुख, रंगराव इंगोले, अॅड. सुभाष कल्याणकर, सुभाष देशमुख, व्यंकटराव कल्याणकर, मोतीराम जगताप, रामराव कदम, आनंद सावते, साहेबराव राठोड, बालाजी शिंदे, माधवराव शिंदे, किशनराव पाटील, दत्ताराम आवातिरक, कमलबाई सूर्यवंशी आदी संचालकांनी व सभासदांनी ठराव मांडून अनुमोदन दिले. या सभेत मागील सभेचे इतिवृतांत वाचून कायम करण्यात आले. तर १६ ठराव मांडून चर्चा करण्यात आली.

हेही वाचा: पीपीपी नको,शासकीय महाविद्यालयच हवे! परभणीकर देणार लढा

कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी कारखान्याचा लेखाजोखा सभासदासमोर मांडून कारखान्याच्या विविध उपक्रमाची व योजनांची माहिती दिली. यावेळी तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, उद्धवराव पवार, जगदीश कल्याणकर, श्यामराव पाटील, शहराध्यक्ष राजु शेटे, नगरसेवक नासेरखाँ पठाण, मुसबीर खतिब, गाजी काजी, आनंदराव कपाटे, नवनाथ कपाटे, संजय लोणे, अवधुतराव पाटील, चंद्रमुनी लोणे, डाॅ. उत्तमराव इंगळे, सरपंच अमोल डोंगरे, कपिल दुधमल, बालाजी कदम, यशवंत राजेगोरे, बाळु पाटील धुमाळ, राजाराम पवार, शंकर ढगे, दत्ता नादरे, संजय गोवंदे, राजू कल्याणकर, दिलीप हाट्टेकर, कामाजी अटकोरे यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

loading image
go to top