esakal | जितेश अंतापूरकर काँग्रेसचे उमेदवार; पारंपरिक दोन घराण्यांत होणार लढत | Jitesh antapurkar
sakal

बोलून बातमी शोधा

Jitesh antapurkar

जितेश अंतापूरकर काँग्रेसचे उमेदवार; पारंपरिक दोन घराण्यांत होणार लढत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देगलूर : विधानसभेच्या देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Assembly election) काँग्रेसने (congress) अपेक्षेप्रमाणे युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जितेश अंतापूरकर (jitesh antapurkar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचे वडील, आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. भाजपने यापूर्वीच सुभाष साबणे (subhash sabne) यांना उमेदवारी जाहीर केली असून आता पारंपरिक दोन घराण्यांत ही पोटनिवडणूक रंगेल. येत्या ३० ऑक्टोबरला मतदान होईल.

हेही वाचा: दागिना बाजार येथे बंगाली बांधवांच्या रक्तदानाने ३११ युनिट रक्त संकलन

जितेश अंतापूरकर हेच काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा यापूर्वीच होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. सात) ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली.

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. उत्तमराव इंगोले रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर गटातर्फे माजी उपनगराध्यक्ष धोंडिबा कांबळे उमेदवारी दाखल करणार आहेत.

loading image
go to top