Atal Anand Ghan Van Project: मातोश्री प्रतिष्ठानमध्ये "अटल आनंद घन वन’’ साकारणार; तब्बल १२ हजार वृक्षांची लागवड; वनमहोत्सव-२०२६ अंतर्गत वृक्षारोपणाचा शुभारंभ

'Atal Anand Ghan Van' Project Launched in Nanded: वनमहोत्सव-२०२६ आणि ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत नांदेडमधील मातोश्री प्रतिष्ठानमध्ये ‘अटल आनंद घनवन’ प्रकल्पाचा शुभारंभ झाला.
Atal Anand Ghan Van Project

Atal Anand Ghan Van Project

esakal

Updated on

नवीन नांदेड: हरित महाराष्ट्र–समृद्ध महाराष्ट्र अभियान तसेच ‘एक पेड माँ के नाम’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत वनमहोत्सव-२०२६ चे औचित्य साधून मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन खुपसरवाडी परिसरात उभारण्यात येणाऱ्या ‘अटल आनंद घनवन’ प्रकल्पाचा गुरुवारी उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभाग, नांदेड यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत मातोश्री प्रतिष्ठानच्या सुमारे एक एकर परिसरात १२ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, विविध ४० प्रजातींच्या रोपांपासून घनवन विकसित केले जाणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी उभारला जाणारा हा उपक्रम आदर्श प्रकल्प ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com