नांदेड जिल्ह्यातील ३४ वाळू घाटांचा लिलाव लवकरच - जिल्हाधिकारी डॉ. विपीन

नांदेड - जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सोमवारी जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा, भणगी, वांगी, त्रिकुट, ब्राह्मणवाडा, नागापूर आदी भागात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला.
नांदेड - जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सोमवारी जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा, भणगी, वांगी, त्रिकुट, ब्राह्मणवाडा, नागापूर आदी भागात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला.

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील ३४ वाळू घाटांचा प्रशासनाच्या वतीने लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. दरम्यान, अवैध वाळू उपसाप्रकरणी जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून बिहारी मजूर वाळू उपसा करत असल्याने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी मंगळवारी (ता. १५) दिली.

दरम्यान, जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता नुसार कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत. अवैध उपसा नदीपात्रातून तराफे, बोट इत्यादीच्या सहाय्याने होऊ नये, त्याची साठवणूक व वाहतूक करु नये, या दृष्टीने हे कलम १४ डिसेंबर २०२० पासून ता. १३ जानेवारी २०२१ या कालावधीपर्यंत सद्यस्थितीत लागू करण्यात आले आहे.
 
जिल्ह्यात गोदावरी तसेच इतर नदीच्या घाटावरून अनेक ठिकाणी अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू आहे. याबाबत जिल्हा प्रशासन मागील अनेक दिवसांपासून कारवाई करत आहे. त्यात जप्त वाळू साठ्यांसह वाळू उपसा करणारे तराफे जाळून नष्ट करण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सोमवारी जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा, भणगी, वांगी, त्रिकुट, ब्राह्मणवाडा, नागापूर आदी भागात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे, निलेश मोरे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर, पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे, सुनील निकाळजे, नायब तहसीलदार मुगाजी काकडे आदी उपस्थित होते. यावेळी ७० तराफे नष्ट करत दोनशे ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

कडक कारवाईचा इशारा 
बिहारी मजूर तराफ्याच्या माध्यमातून वाळू उपसा करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अनेकवेळा ताकीद देऊनही हे मजूर अनेक ठिकाणी वाळू उपसा करण्यात सक्रिय असल्यामुळे बिहारी मजुरांविरोधात तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिला आहे. जप्त वाळू साठ्यातील वाळू ग्रामीण भागातील घरकुल बांधकाम करण्यासाठी पाच ब्रासपर्यंत लाभधारकांना मोफत देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. विपीन यांनी दिली. दरम्यान, आगामी काळात जिल्ह्यातील ३४ वाळू घाट सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अवैध वाळू उपसा थांबला नाही तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले.

कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी या नदीपात्राच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा होत असल्याचे आढळून येत आहे. हा उपसा परराज्यातून स्थलांतरीत झालेल्या मजुरांच्या सहाय्याने काही स्थानिक करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अवैधरित्या वाळुचा होणारा उपसा रोखण्यासाठी व हा उपसा मोठी अवजड वाहने जसे ट्रक (टिपर), हायवा, ट्रॅक्टर आदी मार्फत केला जात आहे. या अवैध वाळू उत्खननाला आळा बसावा व जे लोक या अवैध व्यवसायात गुंतले आहेत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करता यावी, यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता नुसार कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत. हा अवैध उपसा नदीपात्रातून तराफे, बोट इत्यादीच्या सहाय्याने होऊ नये, त्याची साठवणूक व वाहतूक करु नये या दृष्टीने हे कलम १४ डिसेंबर २०२० पासून ता. १३ जानेवारी २०२१ या कालावधीपर्यंत सद्यस्थितीत लागू करण्यात आले आहे. नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांनी व इतरांनी वाळूचा अवैधरित्या साठा करु नये. याचबरोबर याच्या वाहतुकीसाठी कोणत्याही वाहनाचा उपयोग करु नये. सद्यपरिस्थितीत यातील संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकुण घेणे शक्य नसल्याने व तशी खात्री झाली असल्याने १९७३ चे कलम १४४ (दोन) नुसार एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली असल्याचेही जिल्हादंडाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. सदर बाब लक्षात घेता नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांनी, परराज्यातील अथवा स्थानिक अथवा कोणत्याही व्यक्तींनी अवैधरेती उपसा, त्याची साठवणूक, त्यांची वाहतूक करण्यास ता. १४ डिसेंबरपासून ता. १३ जानेवारीपर्यंत ट्रॅक्टर मालक, त्यांची नौकर, ट्रॅक्टर चालक यांना उक्त ठिकाणी वाळू उत्खनन, वाहतूक, साठा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com