esakal | औरंगाबाद- हैदराबाद आणि अमरावती- तिरुपती या दोन्ही उत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ- वेळेत बदल  
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या दोन्ही गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद समाधान कारक आहे. यामुळे या दोन्ही गाड्यांना एका महिन्याची वाढ देण्यात आली आहे.

औरंगाबाद- हैदराबाद आणि अमरावती- तिरुपती या दोन्ही उत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ- वेळेत बदल  

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता दक्षिण मध्य रेल्वे औरंगाबाद – हैदराबाद – औरंगाबाद आणि अमरावती- तिरुपती- अमरावती या उत्सव विशेष गाड्या चालवीत आहे. या दोन्ही गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक आहे. यामुळे या दोन्ही गाड्यांना एका महिन्याची वाढ देण्यात आली आहे. या दोन्ही गाड्यामध्ये अनारक्षित प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही, या गाड्या पूर्णपणे आरक्षित आहेत. 

या विशेष गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे

1) गाडी संख्या 07050  – औरंगाबाद ते हैदराबाद उत्सव विशेष गाडी:  या विशेष गाडीला ता.1 डिसेंबर ते 31 डिसेंबर, 2020  पर्यंत वाढ देण्यात आली आहे. ही गाडी ता. 1 डिसेंबरपासून बदलेल्या वेळेनुसार धावेल. हि गाडी औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून दुपारी -16.15  वाजता सुटेल आणि जालना-17.02, परभणी-19.30 , परळी-22.05  मार्गे हैदराबाद येथे दुसऱ्या दिवशी सकाळी – 06.30 वाजता पोहोचेल. 

2) गाडी संख्या 07049 – हैदराबाद ते औरंगाबाद उत्सव विशेष गाडी : या विशेष गाडीला दिनांक 30 नोवेंबर ते 30 डिसेंबर, 2020 पर्यंत वाढ देण्यात आली आहे. ही गाडी ता. 30 नोवेंबरपासून बदलेल्या वेळेनुसार धावेल. हैदराबाद रेल्वे स्थानकावरून रात्री 22.45 वाजता सुटेल. परळी- 07.10, परभणी-09.30, जालना-11.52 मार्गे औरंगाबाद ला दुपारी -13.20  वाजता पोहोचेल.   

या विशेष गाडीचे असे आहे  वेळापत्रक 

3) गाडी संख्या 02765- तिरुपती-अमरावती द्वी साप्ताहिक उत्सव विशेष गाडी : ही गाडी तिरुपती येथून दर मंगळवारी आणि शनिवारी सुटेल. या गाडीला ता. 1 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. ही गाडी ता. 1 डिसेंबरपासून तिच्या बदलेल्या वेळे प्रमाणे धावेल. हि गाडी दिनांक 1 डिसेंबर पासून तिरुपती येथून दुपारी 16.40 वाजता सुटेल आणि काचीगुडा-04.15 , निझामाबाद-06.40, नांदेड -08.51, पूर्णा-09.40, अकोला-13.45 मार्गे अमरावती येथे दुपारी 15.10 वाजता पोहोचेल. 

4) गाडी संख्या 02766- अमरावती ते तिरुपती द्वी साप्ताहिक उत्सव विशेष गाडी : ही गाडी अमरावती येथून दर सोमवारी आणि गुरुवारी  सुटेल. या गाडीला ता. 3 डिसेंबर ते 31  डिसेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे.  ही गाडी ता. 3 डिसेंबरपासून अमरावती येथून बदलेल्या वेळेनुसार सकाळी 06.45 वाजता सुटेल, अकोला-08.20, पूर्णा-11.50, नांदेड -12.25, निझामाबाद-14.35, काचीगुडा-17.50, मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी  सकाळी 06.25 वाजता पोहोचेल. 

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य  सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.  

loading image