Nanded News : मराठा समाजाच्या आरक्षणाचा फार्म्युला बाळासाहेबांकडे

सुजात आंबेडकर : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निर्धार मेळावा
nanded
nandedsakal

लोहा : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा फार्मुला बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी गुरूवारी (ता.२१) रोजी लोहा येथील वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात केले.

लोहा येथे गुरूवारी रात्री आठ वाजता व्यंकटेश गार्डनच्या मैदानात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमित भुईगळ होते. प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, राज्य सदस्य अक्षय बनसोडे, मोहन राठोड, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, जिल्हा महासचिव शाम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

nanded
Nanded News : हरभऱ्यावरील किडीचे व्यवस्थापन आवश्यक

पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, टीव्हीवर आपण कॉमेडी शो पाहतो, तसे भाजपने संसदेत सुरू केला आहे. संसदेमधील भाजपने नेहरूचा फोटो काढला आहे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला आहे. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला काँग्रेसचे विरोध करु शकत नाहीत. हिंमत असेल तर भाजपने राजस्थान हायकोर्टातील मनूचा पुतळा काढून दाखवावा असे सुजात आंबेडकर म्हणाले.

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, युवा जिल्हाध्यक्ष धीरज हाके, तालुकाध्यक्ष सतीश आणेराव, भारतीय बौध्द महासभेचे बापुसाहेब कापुरे, धोंडीबा यानभुरे, समता सैनिक दलाचे सुभाष खाडेसह आदींनी परिश्रम घेतले. तसेच यावेळी समता सैनिक दलाच्यावतीने युवानेते सुजात आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com