esakal | किनवटच्या केळीला पंजाबमध्ये मागणी, पण शेतकऱ्यांना भुर्दंड | Nanded News
sakal

बोलून बातमी शोधा

किनवट (जि.नांदेड) : किनवट तालुक्यातील शिवणीपासून आठ किलोमीटरच्या अंतरावरील तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गोंडजेवली येथील शेतकऱ्यांनी केळीचे पिक घेतले आहे. पण मोठा खर्च करुनही अपेक्षित भाव मिळत नाही.

किनवटच्या केळीला पंजाबमध्ये मागणी, पण शेतकऱ्यांना भुर्दंड

sakal_logo
By
विठ्ठल लिंगपुजे

शिवणी (जि.नांदेड) - किनवट (Kinwat) तालुक्यातील शिवणीपासून आठ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गोंडजेवली येथील शेतकरी विष्णू नानासाहेब बिराजदार यांनी आपल्या शेतात केळीची लागवड केली आहे. शेती परवडत नाही, असे आपण नेहमीच ऐकतो. शेतमालाचे पडलेले भाव, निसर्गाचा लहरीपणा यामुळे दरवर्षी शेतीची व्यवस्था कोलमडते आहे, असे असतानाही शेतकऱ्यांनी जिद्दीच्या जोरावर शेतात केळीचे पिक घेतले आहे. तसा हा भाग कोरडवाहू (Nanded) आहे. पावसाच्या पाण्यावर बहुतांशी शेतकऱ्यांची शेती आहे. पण शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सिंचनाची सोय करून ऊस, केळी, पपई ही पिके घेत असतात. पण गेल्या वर्षापासून कोरोनाचा काळ असल्याने या दर्जेदार केळीला या भागातील व तेलंगणातील (Banana Grower Farmers) व्यापाऱ्यांकडून भाव मिळत नसल्याने या दर्जेदार केळीला पंजाब व चंडीगड येथून मागणी आहे.

हेही वाचा: पंकजा मुंडेंची अतिवृष्टीच्या मदतीवरुन धनंजय मुंडेंवर टीका, म्हणाल्या..

पण तेथील व्यापारी चांगल्या दर्जाची केळी खरेदी करून त्याची छाटणी करून घेत असल्याने शिल्लक राहिलेली केळी शेतकऱ्यांना उकिरड्यावर व जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. केळीची लागवड केल्यापासून ते केळी काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. यावर्षी पिकावर व्हायरसचा प्रादूर्भाव झाल्याने या भागातील व्यापारी भाव पाडून मागणी करत आहेत. केळी पिकाला वर्षभर मेहनत करून केळीचे पीक घेतले. पण म्हणावा तसा भाव मिळत नसल्याने केळीचे पीक घेणारा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे

हेही वाचा: परभणी जिल्ह्यावर ओल्या संकटाची छाया गडद, पावसामुळे मोठे नुकसान

loading image
go to top