

Reservation Rally Nanded
esakal
किनवट : मराठा समाजाला ओबीसी आरक्षणासाठी राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेतल्याच्या निर्णयानंतर, तेलंगणा व आंध्र प्रदेशात अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट असलेल्या बंजारा समाजालाही महाराष्ट्रातही तोच दर्जा लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी गुरुवार (ता. १८) उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा अतिविशाल मोर्चा काढण्यात आला.