पाणी नदीचं सासर ... पाणी नदीचं माहेर... 

भोकर - तालुक्यात यंदा सरासरी इतका पाऊस झाल्याने नदी - नाले खळखळून लागले वाहू वाहत आहेत. 
भोकर - तालुक्यात यंदा सरासरी इतका पाऊस झाल्याने नदी - नाले खळखळून लागले वाहू वाहत आहेत. 

भोकर (जि. नांदेड) - यंदाचा पावसाळा टपो-या थेंबाची पालखी घेऊन उन्मेषाचा अन् चैतन्याचा सोहळा साजरा करतो आहे. अशा आल्हाददायी वातावरणात चिंब भिजलेल्या मनाला हळुवार गारवा फुंकर घालवीत चेतवीत आहे. एरवी कोरडेपण अंगीकारलेले नदी-नाले आता खळाळून वाहत आहेत. ग्रामीण भागातील महिला पाणवठ्यावर गर्दी करीत असल्याने धोबीघाटाच स्वरूप आले आहे. पाणी नदीचं सासर आणि पाणी नदीचं माहेर असल्याने यंदा नद्यांचे रूपच पालटून गेले आहे. 

भोकर तालुक्यातील पावसाची सरासरी नऊशे ते एक हजार मिलिमीटर इतकी आहे. मागील अनेक वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत असल्याने खरीप व रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. दुसरीकडे टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. 
या वर्षी मात्र पावसाळ्याच्या सुरवातीला दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. 

सगळीकडे पाणीच पाणी 
सध्या पावसाळा निरोपाच्या वाटेवर असताना डोळे वटारल्याने जळी स्थळी पाणीच पाणी झाले आहे. कुठे ढगफुटी, तर कुठे अतिवृष्टीमुळे जमिनीला अक्षरशः खडा फुटला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. रानोवनी, पानोपानी पाऊस नर्तन करीत नखशिखांत भिजवतो आहे. टपोऱ्या थेंबाची पालखी घेऊन आलेला पाऊस आता नकोसा वाटतो आहे. खरे तर पावसाळा अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. त्याचा जोर ओसरेल, अशी आशा होती. पण झालं उलटंच अधिकच मेहेरबान झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. 

यंदा वरुणराजा प्रसन्न 
वर्षानुवर्ष नदी-नाले पाण्यामुळे खळाळत राहत होते पण पाऊस रुसल्याने नदीचा प्रवाह थांबला होता. नद्या आणि ओढे कोरडेठाक पडले होते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर यंदा वरुणराजा प्रसन्न झाला. खळाळणाऱ्या पाण्यामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. ग्रामीण भागातील महिला पाणवठ्यावर गर्दी करीत असल्याने धोबीघाटाचे स्वरूप आले आहे. हे मनोहरी दृश्य गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळाले नाही. या वर्षी मात्र खेडोपाडी ओढ्यावर असे चित्र दिसून येत आहे. पाणी नदीचं सासर.... पाणी नदीचं माहेर झाल्याने नदीच रूप पालटून गेले आहे. 
(संपादन - अभय कुळकजाईकर, नांदेड.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com