मोफत ऑनलाईन उद्योग, विक्री कौशल्य प्रशिक्षणास महिलांचा मोठा प्रतिसाद  

गंगाधर डांगे
Thursday, 3 September 2020

निर्भय नारी फाउंडेशन तर्फे कोरोणाच्या काळातही महिलांना घरात राहूनही हे ऑनलाइन मोफत प्रशिक्षण घेता यावे व त्यांचे विक्री कौशल्य विकसित व्हावे यासाठी हा या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

मुदखेड (जिल्हा नांदेड) : निर्भय नारी फाऊंडेशन  संस्थेच्या वतीने गुरुवारी (ता. तीन) संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील बचत गटाच्या महिलांसाठी उद्योग व विक्री कौशल्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास बचत गटाच्या महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी बचतगटातील महिलांना त्यांच्या लघुउद्योग वाढवण्यासाठी तसेच त्यांचे विक्रिकौशल्य ही विकसित व्हावे यासाठी निर्भय नारी फाउंडेशन तर्फे कोरोणाच्या काळातही महिलांना घरात राहूनही हे ऑनलाइन मोफत प्रशिक्षण घेता यावे व त्यांचे विक्री कौशल्य विकसित व्हावे यासाठी हा या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात संपुर्ण महाराष्ट्रातील विविध ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांची लाक्षणिक उपस्थिति होती.यावर प्रशिक्षणार्थी महिलांनी व्हिडियो द्वारे, एसएमएस द्वारे उत्तम प्रतिसाद मिळाला. हजारो उद्योजक महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

महीलांनी एकत्र येऊन उत्पादन तर वाढवले परंतु महीला मार्केटींग मध्ये कमी पडत आहेत

या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातुन सर्व स्तरातील बचत गट या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. यावर महिलांनी या प्रशिक्षणाचा  प्रत्यक्ष उद्योगात उपयोग करावे असे आवाहन निर्भय नारी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उषा पाटील इंगोले यांनी केले.

हेही वाचा -  भाजपचे ध्येय धोरणं तळागाळापर्यंत पोहंचा- खासदार प्रताप पाटील चिखलीकर -

यावेळी पाटील यांनी बचतगटाच्या माध्यमातून महीलांचा झालेला विकास यावर प्रकाश टाकला त्याचबरोबर महीलांनी एकत्र येऊन उत्पादन तर वाढवले परंतु महीला मार्केटींग मध्ये कमी पडत आहेत याची खंत ही त्यांनी व्यक्त केली आणि म्हणुन महीलांचे मार्केटींग,विक्री कौशल्य सुधारावे यासाठी काही महत्त्वाचे मार्ग त्यांनी सांगितले त्यामध्ये - आँनलाईन आँफलाईन मार्केटींग कसे करायचे हे सविस्तर सांगितले तसेच ग्राहकांना आकर्षित करणे, प्रचारावर लक्ष देणे, विक्री वाढवण्यासाठी व्यवस्था करणे,खर्चावर नियंञण ठेवणे, कमीत कमी कर्ज काढुन व्यवसाय सुरु करणे,खुपच नफेखोरीतुन बचाव करणे, पी.आर.वर विशेष लक्ष देणे,टिम वर्कच महत्व, नेतृत्व करणे, कर्मचाऱ्यांसी स्नेह संबंध जोपासणे त्याच बरोबर प्रामाणिकपणे काम करणे अशा अनेक मुद्यावर उषा पाटील यांनी सविस्तर प्रशिक्षण दिले.

सर्वच महीला अत्यंत आनंदी झाल्या

विशेष म्हणजे त्या स्वतः एक मोटीवेशनल ट्रेनिंग तसेच व्यवसायीक प्रशिक्षक व स्वतः उद्योजीका असल्यामुळे बचत गटातील महिलांना त्यांच्या प्रँक्टीकल अनुभवाचा प्रचंड मोठा फायदा झाला त्यामुळे सर्वच महीला अत्यंत आनंदी झाल्या व त्यांनी video द्वारे आपल्या उत्फुर्त प्रतीक्रीया नोंदवल्या व सामाजीक भावनेतुन निर्भय नारी फाऊंडेशनने महाराष्ट्रातील बचतगटासाठी घेतलेल्या मोफत प्रशिक्षणाचे सर्वञ कौतुक होत आहे...

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big response from women to free online entrepreneurship, sales skills training nanded news