
येत्या २३ जून रोजी मराठवाडा- विदर्भ व्हर्चुअल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या व्हर्चुअल रॅलीचे यूट्यूब वरून प्रसारण केले जाणार
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोदी सरकार-२ पर्वातील पाहिले वर्षपूर्ती होत आहे. या वर्ष पूर्तीनिमित्त देशभरातील जनतेशी भाजपचे राष्ट्रीय नेते संवाद साधणार असून मराठवाडा- विदर्भातील जनतेशी, भाजपा कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी येत्या २३ जून रोजी मराठवाडा- विदर्भ व्हर्चुअल रॅली आयोजित करण्यात आली आहे.
या व्हर्चुअल रॅलीचे यूट्यूब वरून प्रसारण केले जाणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावाकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, व्हर्चुअल रॅलीचे जिल्हा संयोजक तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांनी दिली आहे.
भ्रष्टाचार मुक्त भारत, अखंड भारत निर्माण, स्वच्छ, निर्मल भारत निर्माण
देशात सन २०१४ मध्ये जे राजकीय परिवर्तन झाले. भाजपाच्या हाती केंद्रातील सत्ता सोपविण्यात आली. नरेंद्र मोदी यांना देशातील बहुसंख्य जनतेनी एका विश्वासाने पंतप्रधान म्हणून स्विकारले. ते परिवर्तन खऱ्या अर्थाने भारताला लोकशाहीच्या मार्गावर नेणारे ठरले. भ्रष्टाचार मुक्त भारत, अखंड भारत निर्माण, स्वच्छ, निर्मल भारत निर्माण करण्याचा जो संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. ते संकल्प पहिल्या पर्वत पूर्णत्वास नेले.
हेही वाचा - Breaking News : नांदेडात माजी महापौरांसह नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह
लोक हिताची कामे केली कामे
सामान्य, बेघर नागरिकांना हक्कच पक्क घर, प्रत्येक घरात वीज, गॅस पुरवला. सत्तेच्या एका पर्वत पंतप्रधान मोदींनी अवघ्या पाच वर्षात जी लोक हिताची कामे केली ते कामे या देशातील यापूर्वीच्या अन्य पक्षांच्या कोणत्याही सरकारला करता आली नाहीत. आतंकवाद, घुसखोरी, पाकिस्तानी दहशतवादी यांचे सर्जिकल स्ट्राईक करण्याचे धाडस मोदींनीच केले. पहिल्या पर्वातील लोक हिताच्या आणि अखंड राष्ट्र हिताच्या कामावर विश्वास टाकत देहात लोकांनी २०१९ मध्ये मोदी- २ पर्वाची सुरुवात केली. दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी या देशाचे बळकट, दणकट, कणखर आणि विश्वासू पंतप्रधान झाले.
मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिली वर्षपूर्ती
मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिली वर्षपूर्ती साजरी होत आहे. या एका वर्षाच्या काळात पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून जम्मू काश्मीर भारताशी जोडले आणि अखंड भारत निर्माण केला. आंतरराष्ट्रीय दहशतवाद मिळून काढण्यासाठी विविध सैन्याना बळ देवून दहशतवाद उखडून काढण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. कोरोनाने जग हैराण असताना भारतात लॉकडाऊन लागू करून संसर्गची तीव्रता कमी केली. करोडो लोकांच्या प्राण वाचविले. याच काळात अडचणीत सापडलेल्या जनतेला मदत करण्यासाठी जनाधन खात्यावर, शेतकऱ्यांचा बँक खात्यावर थेट आर्थिक मदत जमा केली.
येथे क्लिक करा - योगदिनी आमदारांनी पहाटेच केले गुलाबपुष्पांनी स्वागत
भाजपा कार्यकर्त्या सोबत संवाद साधण्यासाठी व्हर्चुअल रॅली
गोर गरिबांना मोफत धान्य वाटप केले. देशाची आर्थिक, औद्योगिक बाजू कमकुवत पडणार नाही यासाठी खरे नियोजन केले. या व अशा विविध निर्णय, लोक हिताची काम, राष्ट्र हिताचे निर्णय याची माहिती जनतेला देण्यासाठी आणि भाजपा कार्यकर्त्या सोबत संवाद साधण्यासाठी व्हर्चुअल रॅली चे येत्या २३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता यू ट्यूब वर आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर हे मार्गदर्शन करणार असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रास्ताविक करणार आहेत. व्हर्चुअल रॅलीच जनतेनी, भाजपा कार्यकर्त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन.