mla madhavrao patil javalgaonkar
mla madhavrao patil javalgaonkarsakal

जनतेच्या आशीर्वादामुळेच विकासाची कामे पूर्ण; आमदार माधवराव पाटील जवळगावकर

हिमायतनगरला विकासकामांचा शुभारंभ
Published on

हिमायतनगर : हिमायतनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. आज शहराच्या विविध विकास कामासाठी मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तीन कोटी रूपयांचा विकास निधी नगरविकास खात्याकडून मंजूर करून आणला आहे. शहरासह हदगाव, हिमायतनगर विधानसभा क्षेत्रात विकासाची घौडदौड सुरू असून जनतेच्या आशीर्वादाने विकास कामे पुर्ण होत आहेत, याचा आपणास मनस्वी आनंद होत आहे. अश्या भावना आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यक्त केल्या.


mla madhavrao patil javalgaonkar
नांदेड : ‘दारू’ला रस्त्यातूनच फुटले पाय !

हिमायतनगर शहरातील पाटील हॉस्पीटल ते नडवा अंतर्गत ९० लक्ष रूपयाच्या रस्त्याचे भूमिपूजन रविवारी (ता.२३) आमदार जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात आमदार जवळगावकर बोलत होते. पुढे बोलतांना आमदार जवळगावकर म्हणाले की, नगरपंचायत अंतर्गत तीन कोटी रूपये विकास निधी उपलब्ध करण्यात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य मंत्री अशोक चव्हाण यांचे मोलाचे योगदान असून विकास कामासाठी आपण कमी पडणार नाही.

मधल्या काळात नगरपंचायतमध्ये जे रामायण घडले आहे तर, त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहातच, विकास कामासाठी निधी खेचून आणणे तर सोडाच, परंतू अगोदरच्या मंजूर निधीत किती सावळा गोंधळ झाला. याची कल्पनाच न केलेली बरी, अशी टिका विरोधकांचे नाव न घेता आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली. तसेच पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून आपण जनतेच्या आशीर्वादाची उतराई ही विकास कामे पूर्ण करुन करणार असल्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक अनगुलवार यांनी केले, तर आभार माजी सभापती परमेश्वर गोपतवाड यांनी मानले.


mla madhavrao patil javalgaonkar
नांदेड : आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या वैयक्तीक संचिकेला फुटले पाय

या प्रसंगी तहसीलदार तथा नगरपंचायतीचे प्रभारी सीईओ डि.एन. गायकवाड, सुभाष राठोड, शेख रफिक शेठ, शासकीय गुत्तेदार सुरेश अप्पा पळशीकर, प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर, प्रथम नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद, सभापती डॉ. प्रकाश वानखेडे, समदखान पठाण, शहराध्यक्ष संजय माने, जनार्दन ताडेवाड, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता तुंगेनवार, शाखा अभियंता डांगे, गोविंद बंडेवार, राजेश चिकनेपवाड, अश्रफ खान, फेरोजखान, अभिषेक लुटे, शिवाजी पाटील, सुभाष शिंदे, ज्योती दिलीप पार्डीकर, शेख रहीम शेठ, डॉ. शेषेराव चव्हाण, अ. बाकी शेठ, आदींसह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com