esakal | कोरोनाग्रस्तांसाठी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून रक्तदान; 107 बाटल्या रक्त संकलीत
sakal

बोलून बातमी शोधा

रक्तदान शिबीर

कोरोनाग्रस्तांसाठी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून रक्तदान; 107 बाटल्या रक्त संकलीत

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना संसर्गजन्य आजाराची लागण झालेल्या रुगणांच्या उपचारासाठी रक्ताची गरज लक्षात घेऊन टीचर्स क्लब रुग्णालय कौठा नांदेड येथे नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या रक्तदान शिबाराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील, मनपा नांदेडचे माजी विरोधी पक्ष नेते जीवन पाटील घोगरे, माजी सभापती भाऊसाहेब गोरठेकर, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर, प्रा. मझरोद्दीन, राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोकर तालुकाध्यक्ष शिवाजी कदम, शिवाजीराव वाडीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसचिव बाळासाहेब भोसीकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उपाध्यक्ष रेखाताई आहिरे, रवींद्रसिंघ पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा - विशेष स्टोरी : बेसुमार वृक्षतोडीमुळे मधमाशांचा अधिवास धोक्यात; शेतीचे होत आहे नुकसान

या रक्तदान शिबिरात १०७ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या रक्तदान शिबाराचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस डी. बी. जांभरुनकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन पापंटवार यांनी केले.

loading image
go to top