नांदेडच्या श्रावस्तीनगर भागात धाडशी घरफोडी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

ही घरफोडी रविवारी (ता. २१) ते सोमवारी (ता. २२) रात्रीच्या दरम्यान झाली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : शहराच्या श्रावस्तीनगर भागातील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या- चांदीच्या दागिण्यासह नगदी असा पावणेचार लाखाचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी रविवारी (ता. २१) ते सोमवारी (ता. २२) रात्रीच्या दरम्यान झाली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रावस्तीनगर येथील नितीन सावंत हे एका खासगी हॉटेलवर नोकरी करतात. पंरतु सध्या लॉकडाउन असल्याने त्यांचे हॉटेल बंद आहे. म्हणून ते आपल्या परिवारासह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या- चांदीचे दागिणे व नगदी असा तिन लाख ५८ हजार ३४० रुपयाचा ऐवज लंपास केला. 

अगोदरच लॉकडाउनमुळे हातावरील काम गेले

एवढेच नाही तर या चोरट्यांनी घराशेजारी असलेली अशोक वगरे यांचा पानठेला फोडून आतील २० हजाराचा माल लंपास केला. ही बाब मंगळवारी (ता. २३) रोजी उघडकीस आल्याने नितीन सावंत यांना चांगलाच धक्का बसला. अगोदरच लॉकडाउनमुळे हातावरील काम गेले. त्यात घरी मोठी चोरी झाली. यामुळे ते खचुन गेले. घरफोडीची माहिती त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात येऊन दिली. पोलिस निरीक्षक अनंत नरुटे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांनी घटनास्थळी भेट दिली. 

 हेही वाचा -  नांदेडमध्ये दुचाकी चोराला पोलिस कोठडी, नऊ वाहने जप्त

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा

त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांनीही घटनेची पाहणी केली. पोलिसांच्या श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांनी आपला कुठलाच माग मागे ठवेला नसल्याने श्‍वान पथकाला खाली हात माघारी परतावे लागले. नितीन गजानन सांवत यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे करत आहेत. 

गाडी चालविण्याच्या कारणावरुन एकाला मारहाण 

नांदेड : गाडी निट चालवता येत नाही का असे म्हणून एकाला अडवून त्याची दुचाकी पाडून फायटरने कमरेवर व कानावर जबर मारहाण केली. यात त्याच्या कानाचा पडदा फाटून जबर दुखापत झाली. ही घटना शिवरोड ते विमानतळ रस्‍त्यावरील आसरानगर पाटीजवळ सोमवारी (ता. २२) रात्री साडेआठ वाजता घडली. 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, गौरव भगवान जाधव (वय २६) रा. मुल्लागल्ली हदगाव ह. मु. दीपनगर नांदेड हा आसना बायपासकडून आपली दुचाकी (एमएच२६-एजी-६९४६) वरून घराकडे येत होता. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो आसरानगर पाटीसमोर येताच त्याला तेथे थांबलेल्या काही युवकांनी अडविले. गाडी निट चालविता येत नाही का म्हणून वाद घातला. एवढेच नाही तर त्याच्या कमरेवर व कानावर फायटरने जबर मारहाण केली. 

येथे क्लिक करा बुधवारी दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

विमानतळ पोलिस ठाण्यात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

यात गौरव जाधव याच्या कानाला जबर मार लागून रक्तश्राव झाला. यानंतर मारेकरी पसार झाले. जखमी अवस्थेत हा तरुण विमानतळ पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तर जखमीना शासकिय रुग्णालयात मंगळवारी (ता. २३) रात्री गुन्हा दाखल केला. गौरव जाधव यांच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आला. तपास पोलिस हवालदार गायकवाड करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bold burglary in Shravastinagar area of ​​Nanded