esakal | प्लाझ्मा व रक्तदानासाठी ब्राह्मण समाजाने पुढे यावे- ब्राह्मण महासंघाचे निखिल लातूरकर
sakal

बोलून बातमी शोधा

निखील लातूरकर

प्लाझ्मा व रक्तदानासाठी ब्राह्मण समाजाने पुढे यावे- ब्राह्मण महासंघाचे निखिल लातूरकर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना वैश्विक महामारीमुळे नांदेड शहरात असंख्य नागरिक त्रस्त आहेत. यादरम्यान सर्वजातीय मदतीसाठी संदेश देण्यासाठी ब्राह्मण समाजाने पुढे यावे.

कोविड संक्रमित होऊन बरे झालेल्या ब्राह्मण व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावा, तर जे कोरोना बाधित नाहीत अश्यांनी रक्तदानासाठी पुढे सरसावयाला हवे. कारण ब्राह्मण समाजातील अनेक बांधव कोरोनामुळे आपल्याला कायमचे सोडून गेले. त्यांना प्लाझ्मा मदतीची गरज होती, पण ती योग्यवेळी मिळू शकली नाही.

हेही वाचा - विधायक बातमी : वसमत येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रास मार्बल, ठिबक संच धम्मदान

देशाच्या इतिहासात ब्राह्मण समाज अद्यापपर्यंत सेवा कार्यासाठी अग्रेसर राहिला आहेच. आणि या कोविड महामारीसाठीही अग्रेसर राहील यात शंका नाही.

समाजातील नागरिकांनी न घाबरता प्लाझ्मा व रक्तदानासाठी पुढे यावे व देशहित, राष्ट्रहितासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष निखिल लातूरकर यांनी केले आहे.

loading image